एकनाथ खडसेंच्या गडाला सुरुंग, जळगाव दूध संघावर भाजप-शिंदे गटाचं वर्चस्व, महाजन ठरले किंगमेकर 

एकनाथ-खडसेंच्या-गडाला-सुरुंग,-जळगाव-दूध-संघावर-भाजप-शिंदे-गटाचं-वर्चस्व,-महाजन-ठरले-किंगमेकर 

News

  • मुख्यपृष्ठ
  • बातम्या &nbsp/ महाराष्ट्र
  • Jalgaon Dudh Sangh : एकनाथ खडसेंच्या गडाला सुरुंग, जळगाव दूध संघावर भाजप-शिंदे गटाचं वर्चस्व, महाजन ठरले किंगमेकर 

Jalgaon Dudh Sangh : एकनाथ खडसेंच्या गडाला सुरुंग, जळगाव दूध संघावर भाजप-शिंदे गटाचं वर्चस्व, महाजन ठरले किंगमेकर 

Jalgaon Dudh Sangh Elections Result : जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत भाजप-शिंदे गटानं विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंना हा धक्का मानला जात आहे.

Jalgaon Dudh Sangh Elections Result victory of BJP-Shinde group defeat of Ncp Leader Eknath Khadse group Jalgaon Dudh Sangh : एकनाथ खडसेंच्या गडाला सुरुंग, जळगाव दूध संघावर भाजप-शिंदे गटाचं वर्चस्व, महाजन ठरले किंगमेकर 

Jalgaon Dudh Sangh Elections Result

Jalgaon Dudh Sangh Elections Result : जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत (Jalgaon Dudh Sangh Elections) राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना (Eknath Khadse) मोठा धक्का बसला आहे. खडसेंचं वर्चस्व असलेल्या जळगाव दूध संघावर भाजप-शिंदे गटानं (BJP-Shinde group) विजय मिळवला आहे. एकूण 20 पैकी 16 जागांवर भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे (Manda Khadse) यांना देखील पराभवाचा धक्का बसला आहे. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी त्यांचा पराभव केला आहे. खडसे यांच्या गटाला केवळ चार जागा  मिळाल्या आहेत.

भाजप-शिंदे गटाकडून विजयाचा जल्लोष 

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवारांनी मुसंडी मारली आहे. 20 जागांपैकी 16 जागांवर भाजप शिंदे गटाच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर 4 जागांवर महाविकास आघाडीचे उमदेवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीच्या निमित्तानं एकनाथ खडसे यांच्या गडाला सुरुंग लावला आहे. मतमोजणी केंद्राच्या बाहेर भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून विजयाचा जोरदार जल्लोष केला जात आहे.

विरोधकांनी खोक्याची ताकद लावून निवडणूक जिंकली, खडसेंचा आरोप

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलच्या पराभवानंतर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे यांनी या निवडणुकीत त्यांच्या पॅनेलचा झालेला पराभव मान्य केला आहे. विरोधकांनी खोक्याची ताकद लावली आहे. त्यापर्यंत आम्ही गेलो नाही. आर्थिक बळावर विरोधकांनी ही निवडणूक जिंकल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केला आहे.

एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात होती रस्सीखेच 

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत होते. त्यामुळं जळगाव जिल्ह्याचं राजकीय वातावरण चांगलचं तापलं होतं. दूध संघ ताब्यात घेण्यासाठी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात रस्सीखेच होती. या दोन्ही नेत्यांमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह सात आमदार हे एकनाथ खडसे यांच्या विरोधात उभे ठाकले असल्याने एकनाथ खडसे हे एकटे पडल्याचं चित्र पाहायला मिळालं होते. एकूणच आजपर्यंत कोणत्याही दूध संघाची निवडणूक राजकीय आखाडा बनली नसेल अशी जळगाव दूध संघाची निवडणूक आखाडा बनली होती त्यामुळं या निवडणुकीच्या निकालाकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. अखेर या निवडणुकीत एकनाथ खडसेंच्या गटाचा पराभव करत भाजप आणि शिंदे गटाने विजय मिळवला आहे. 

News Reels

महत्त्वाच्या बातम्या:

Eknath Khadse : खडसेंना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का, पत्नी मंदा खडसेंचा पराभव, भाजप-शिंदे गटाची विजयाकडे वाटचाल 

Published at : 11 Dec 2022 11:41 AM (IST) Tags: election jalgaon Girish Mahajan Gulabrao Patil Eknath Khadse Gulabrao Patil 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *