उर्फी जावेदविरोधात चित्रा वाघ आक्रमक

- मुख्यपृष्ठ
- करमणूक  / बॉलीवूड – bollywood news
- Urfi Javed: ‘जेव्हा ती सापडेल, त्या दिवशी तिचं थोबाड रंगवेन’; उर्फी जावेदविरोधात चित्रा वाघ आक्रमक
Urfi Javed: ‘जेव्हा ती सापडेल, त्या दिवशी तिचं थोबाड रंगवेन’; उर्फी जावेदविरोधात चित्रा वाघ आक्रमक
‘हा नंगानाच आम्ही महाराष्ट्रामध्ये चालू देणार नाही.’ असं म्हणतं चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उर्फी जावेदवर (Urfi Javed) टीका केली आहे.
Chitra Wagh,Urfi Javed
Chitra Wagh: भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उर्फी जावेदवर (Urfi Javed) पुन्हा निशाणा साधला आहे. ‘हा नंगानाच आम्ही महाराष्ट्रामध्ये चालू देणार नाही.’ असं म्हणतं चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर टीका केली आहे.
काय म्हणाल्या चित्रा वाघ?
चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा उर्फी जावेदवर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, ‘व्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारणाऱ्यांना लाज वाटत नाही? व्यक्ती स्वातंत्र्याचा स्वैराचार माजवला आहे. चार भिंतींच्या आत तुम्ही उघडे-नागडे नाचा, आम्हाला त्याचं काही वाटणार नाही पण ज्यावेळी सार्वजनिक ठिकणी अशा पद्धतीनं कोणी वागले तर तुम्हाला त्याचा प्रसाद मिळेल. मी पुन्हा एकदा सांगितले, पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मी केली आहे. ज्या दिवशी मला ती सापडेल. तेव्हा पहिल्यांदा तिचं थोबाड रंगवेन आणि नंतर मी तुम्हाला ट्वीट करुन सांगेल की, मी काय केलं. हा नंगानाच आम्ही महाराष्ट्रामध्ये चालू देणार नाही.’
उर्फीविरोधात महिला सामाजिक संस्था आक्रमक
उर्फीच्या विरोधात मुंबईतल्या महिला सामाजिक संस्था आक्रमक झाल्या आहेत. उर्फी ही सार्वजनिक ठिकाणी तोकडे कपडे घालून अंगप्रदर्शन करत आहे. त्यामुळे समाजातील तरुण मुले मुली यांच्यावर प्रभाव पडत आहे. त्यामुळे तिच्या विरोधात सक्त कारवाई करावी, अशी मागणी या सामाजित संस्थांनी केली आहे. मराठा प्रतिष्ठान,गायत्री महिला सामाजिक विकास संस्था,पंचशील महिला सहकारी संस्था, संजीवनी महिला प्रतिष्ठान,साहियार महिला संस्था या संस्था उर्फीविरोधात आक्रमक झाल्या आहेत.
News Reels
‘उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करा’ अशी मागणी चित्रा वाघ यांनी पोलिसांकडे केली होती. एक ट्वीट चित्रा वाघ यांनी शेअर केले होते. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं होतं, ‘मुंबईच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी बिभत्स आणि किळसवाणे अंगप्रदर्शन करत फिरणाऱ्या उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी यासाठी मुंबईचे मा. मुंबई पोलीस आयुक्तांची तसेच सहआयुक्त कायदा आणि सुव्यवस्था यांची भेट घेतं मागणी केली.‘
मुंबई च्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी बिभत्स व किळसवाणे अंगप्रदर्शन करत फिरणाऱ्या #उर्फीजावेद वर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी यासाठी
मुंबईचे मा[email protected] तसेच सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था यांची भेट घेतं मागणी केली @MumbaiPolice @BJP4Maharashtra @BJP4Mumbai pic.twitter.com/M3HHpvTyMB— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 1, 2023
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Urfi Javed: ‘मी आता तुरुंगात जाण्यास तयार आहे, फक्त तुम्ही सांगा की….’; चित्रा वाघ यांच्यावर भडकली उर्फी जावेद