उर्फी जावेदला का घेतलं दुबई पोलिसांनी ताब्यात? खरं कारण आलं समोर

मुंबई, 22 डिसेंबर : सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद कायम चर्चेत असते. बोल्ड अंदाज, हटके फॅशन, अतरंगी कपडे यामुळे उर्फी कायमच चर्चेचा विषय ठरते. रोज नवनवीन हटके लुकमध्ये उर्फी मीडियासमोर येत असते. उर्फी जावेद अनेकदा सोशल मीडियावर बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडताना दिसते, ज्यामुळे तिला तीव्र टीकेलाही सामोरं जावं लागतं. मात्र उर्फीला आणि तिच्या अतरंगी लुकला दुर्लक्षित करणंही तितकंच अवघड आहे. मात्र दरवेळी आपल्या फॅशनमुळे चर्चेत असणारी उर्फी मागच्या दोन दिवसांपासून वेगळ्याचं कारणामुळं चर्चेत आली आहे.
उर्फीला दुबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त समोर आले होते. तिने दुबईत सार्वजनिक ठिकाणी विचित्र कपडे परिधान केल्याने तिच्या विरोधात तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र आता या संपूर्ण प्रकरणावर उर्फीने मौन सोडत तिची बाजू मांडली आहे.
हेही वाचा – Bhagya Dile Tu Mala: कावेरीसाठी राज देणार सत्वपरीक्षा; गुहागर मध्ये बहरणार काकू आणि बोक्याचं प्रेम
‘झूम एंटरटेनमेंट’ने दिलेल्या वृत्तानुसार, उर्फीने दुबई पोलिसांनी चौकशी केल्याच्या प्रकरणावर तिची बाजू मांडली आहे. ती म्हणाली कि, ”लोकेशनमध्ये काही तरी अडचण असल्याने शूट थांबवण्यासाठी पोलीस आले होते. सार्वजनिक ठिकाण असल्याने आम्हाला ठराविक वेळेसाठीच शूटिंग करण्याची परवानगी होती. प्रॉडक्शन टीमने वेळ वाढवण्याबद्दल परवानगी घेतली नव्हती, त्यामुळे आम्हाला ते लोकेशन सोडून जावं लागलं. माझ्या कपड्यांशी त्याचा काही संबंध नव्हता. पोलिसांनी शूट थांबवल्यामुळे आम्ही दुसऱ्या दिवशी उर्वरित भाग शूट केला, त्यामुळे सर्व काही ठीक झालंय” असं उर्फीने म्हटलंय.
उर्फी जावेद तिच्या आगामी काही प्रोजक्ट्सच्या शूटिंगसाठी दुबईला गेली होती. इथे तिने नेहमीप्रमाणे विचित्र कपडे परिधान करत काही व्हिडीओ शूट केले, पण तिथल्या लोकांना ते रुचलं नाही आणि त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर स्थानिक पोलिसांकडून उर्फीची चौकशी केली गेली होती. अशी बातमी काल समोर आली होती. पण आता उर्फीने या प्रकारावर प्रतिक्रिया देत तिच्यासाठी पोलीस आले नसल्याचं सांगितलं आहे. यामुळे उर्फीच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, युजर्स उर्फी जावेदच्या फॅशन सेन्सला ट्रोल करत असले तरी ते स्वतः अभिनेत्रीकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत. उर्फी जावेदनं स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तिने सुरुवातीच्या काळाच अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. आपल्या अभिनयाची छाप सोडत तिने अनेक भूमिका साकारल्या आहेत. मात्र तिला खरी ओळख, खरी लोकप्रियता बिग बॉस ओटीटीमुळे मिळाली. त्यानंतर तिचा चाहतावर्ग वाढला आणि आता तो दिवसेंदिवस वाढतच आहे. क्रिएटिव्हिटीमुळे तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो आणि अनेकवेळा तिच्या कामाचं कौतुकही होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.