उद्धवजींबद्दल आदरच पण जेव्हा घर पेटतं तेव्हा.., नेमकं काय म्हणाले दीपक केसरकर

उद्धवजींबद्दल-आदरच-पण-जेव्हा-घर-पेटतं-तेव्हा.,-नेमकं-काय-म्हणाले-दीपक-केसरकर

शिर्डी, 1 जानेवारी :  आज वर्षाचा पहिला दिवस आहे. अनेकांनी शिर्डी साईबाबांचं दर्शन घेऊन आपल्या नववर्षाची सुरुवात केली. मंत्री दीपक केसरकर यांनी देखील साईबाबांचं दर्शन घेऊन आपल्या नव्या वर्षाची सुरुवात केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. साईबाबांकडे काही मागण्याची गरज पडत नाही, ते सर्व काही देतात. उद्धव ठाकरेंबद्दल मला आदर आहे. मात्र आता कटुता कमी करणं हे उद्धवजींच्या हातात आहे. मी त्यांचा आदर ठेवणारा माणूस आहे, असं केसरकर यांनी म्हटलं.

नेमकं काय म्हणाले केसरकर? 

उद्धव ठाकरेंबद्दल मला आदर आहे. मात्र आता कटुता कमी करणं हे उद्धवजींच्या हातात आहे. मी त्यांचा आदर ठेवणारा माणूस आहे. जेव्हा घर पेटतं तेव्हा आधी आगीवर नियंत्रण मिळवावं लागतं , आग कशामुळे लागली ते नंतर बघू , अगोदर आपण आपलं घर सुरक्षित ठेवू असं मी तेव्हा उद्धव ठाकरे यांना बोललो होतो. मात्र ते  त्यांची लोक जे सांगतात त्यावर आपलं मत बनवत असतात. मी जे बोलणार ते उद्धवजींबाबत नाही तर त्यांना जे फिडबँक देतात ‌त्यांना बोलणार आहे. मी सगळ्या प्रश्नांना उत्तर देणार असल्याचं केसरकर यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : एकनाथ खडसेंच्या सुनबाई खासदार रक्षा सासऱ्याच्या मदतीला; गिरिष महाजन म्हणतात..

‘उद्धवजींनी आत्मपरीक्षण करावं’

दरम्यान पुढे बोलताना दीपक केसरकर यांनी म्हटलं की, मला ते बोलले त्याचं दु; ख वाटल नाही. पन जे काही माध्यमात दाखवलं गेल त्यामुळे भावना दुखावल्या गेल्या आहेत. असं होता कामा नये , प्रेमाचा आदर आहे तो कमी होता कामा नये. मी सगळ्यांना उत्तर देणार आहे. पैशाने प्रेम विकत घेता येत नाही, प्रेमानं मन जिंकावी लागतात. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांची मनं जिंकली. निश्चित काही तरी घडलं त्यामुळे एवढी सगळी लोक सोडून गेली. मी जसं आत्मपरिक्षण केलं तसं उद्धव ठाकरे यांनी करावं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *