उदय सामंत यांना जवळ बोलावलं, सोबत फोटो काढला नि अजित पवार म्हणाले,…

उदय-सामंत-यांना-जवळ-बोलावलं,-सोबत-फोटो-काढला-नि-अजित-पवार-म्हणाले,…

आमचा दोघांचाच फोटो काढ. बाकी सर्व बाजूला व्हा. आता हा फोटो बघून एकनाथराव…

नागपूर : विधिमंडळाबाहेर अजित पवार (Ajit Pawar) यांचं कार्यकर्त्यांसोबत फोटो सेशन सुरू होतं. वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेले कार्यकर्ते अजित पवार यांच्यासोबत फोटो काढत होते. तेवढ्यात उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) त्याठिकाणी आले. त्यांना अजित पवार यांनी बोलावून घेतलं. आता आमचा दोघांचाच फोटो काढा, असं सांगत अजित पवार यांनी इतर कार्यकर्त्यांना बाजूला व्हायला सांगितलं. अजित पवार यांनी उदय सामंत यांच्या खांद्यावर हात टाकला. दोघांनी हसतमुखानं पोज दिली.

नंतर अजित पवार जे उदय सामंत यांना म्हणाले तो संवाद व्हायरल झाला. हे एकेकाळी अध्यक्ष केलंय. इकडं ये रे. आमचा दोघांचाच फोटो काढ. बाकी सर्व बाजूला व्हा. आता हा फोटो बघून एकनाथराव…

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीसुद्धा असाच एक प्रसंग घडला. राष्ट्रवादीचे आमदार विधिमंडळाबाहेर उभे होते. मंत्री अतुल सावे विधिमंडळातून बाहेर पडले. त्यानंतर अजित पवार यांनी अतुल सावे यांची फिरकी घेतली. सावे साहेब तुम्ही मंत्री झाल्यापासून इतके बदललात. मी देवेंद्रना दहा वेळा सांगतोय, जरा सावेंना सांगा. इतकं तुटक-तुटक नसतं राहायचं. सत्ता येत-जात असते. माणसं जोडायची असतात.

सभागृहात कितीही गोंधळ होत असला तरी सभागृहाबाहेर खेळीमेळीचं वातावरण असतं. ज्या सोमय्यांनी पेडणेकरांवर आरोपांवर आरोप लावले त्यांच्या एका कार्यक्रमातला एक व्हिडीओही चर्चेत राहिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *