ईशानच धोनीची जागा चालवणार, उलटा पळत गेला अन् पठ्ठ्याने कॅच घेतलाच!

ईशानच-धोनीची-जागा-चालवणार,-उलटा-पळत-गेला-अन्-पठ्ठ्याने-कॅच-घेतलाच!

ईशानच धोनीची जागा चालवणार, उलटा पळत गेला अन् पठ्ठ्याने कॅच घेतलाच!

ईशान मानलं भावा, धोनीसाबत होत आहे तुलना!

Updated: Jan 4, 2023, 01:15 AM IST

Ishan Kishan Catch Ind Vs SL :  भारत आणि श्रीलंकेमध्ये झालेल्या (Ind vs SL T20) पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला (India Win T20 Match vs Srilanka 2023) आहे. सांघिक कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने वर्षाच्या सुरूवातीचा पहिला सामना जिंकला आहे. युवा टीममध्ये आता गेल्या काही दिवसांपूर्वी द्विशतक ठोकणारा ईशान किशनही होता. ईशान किशनचा सामन्यामधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. (Ind Vs SL T20 Ishan Kishan Catch trending viral video latest marathi sport news)

नक्की काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये? (Ishan Kishan Catch trending viral video)
श्रीलंकास संघ भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करत असताना सामन्याच्या 8 व्या षटकात ईशान किशनने डोळ्याचं पारणं फेडणारा झेल घेतला. युवा गोलंदाज उमरान मलिक संघाचं 8 वं षटक टाकत होता. षटकातील पाचव्या चेंडूवर असलंकाने चेंडू जोरात टोलवला. पूल शॉट मारण्याच्या नादात चेंडू बॅटची कडा घेऊन  मागच्या दिशेने गेला. 

#BestOf2018

Diving Dhoni! How good was that catch from @msdhoni? pic.twitter.com/O08rDgOZCN

— BCCI (@BCCI) December 31, 2018

इशान किशनच धोनीची जागा चालवणार,
उलटा पळत गेला अन् पठ्ठ्याने कॅच घेतलाच!#Ishankisan #Dhoni #IndvsSL1stT20I #HardikPandya #म pic.twitter.com/wHU2JCnlcD

— Harish Malusare (@harish_malusare) January 3, 2023

चेंडू उंच उडाल्यावर कीपर ईशान किशन उलटा धावत गेला, चेंडूकडे नजर ठेवत तो मागच्या दिशेने धावत गेला आणि चेंडू खाली आल्यावर उडी मारत झेल पकडला. ईशानने झेल पकडल्यावर कर्णधार हार्दिक पंड्याचाही विश्वास बसला नाही आणि तो हसायला लागला. कारण मागे आधीच हर्षल पटेल  फिल्डिंगसाठी उभा होता त्याने हा कॅच अगदी सहज घेतला असता. 

ईशानच्या कॅचने झाली धोनीची आठवण 
2018 साली भारत आणि वेस्ट इंडिजमधील एकदिवसीय सामन्यात धोनीनेही असाच धावत जावून अप्रतिम झेल घेतला होता. वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात बुमराह गोलंदाजी करत असताना चंद्रपाल हेमराजचा मारलेला चेंडू असाच मागे गेला होता. धोनीने त्यावेळी चपळता दाखवत कमाल कॅच पकडला होता. आजचा धोनीचा कॅच हा ईशानसारखाच असल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. 

दरम्यान, तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0  ने आघाडी घेतली आहे. भारताने हा सामना 2 धावांनी जिंकला आहे. भारताकडून शिवम मावीने पदार्पण सामन्यात सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. उमरान मलिक आणि हर्षल पटेलने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *