आशुतोष राणाचं नाव घेताच बायको आली धावून; शाहरुख आणि रेणूका शहाणेचं ट्विट चर्चेत

आशुतोष-राणाचं-नाव-घेताच-बायको-आली-धावून;-शाहरुख-आणि-रेणूका-शहाणेचं-ट्विट-चर्चेत

मुंबई,  13 जानेवारी : अभिनेता सलमान खान सध्या पठाण सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आहे. सिनेमाचा वाद एकीकडे सुरू असला तरी दुसरीकडे  शाहरुख मात्र चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहे. शाहरुख ट्विटरवर घेत असलेल्या आस्क एनिथिंग या सेशनची सध्या जोरदार चर्चा आहे. चाहत्यांच्या प्रश्नांची शाहरुख स्वत: उत्तरं देताना दिसतोय.  #askSRKया सेशलमध्ये पठाण सिनेमाच्या निगडीत अनेक प्रश्न शाहरुखला विचारण्यात आले. तसंच या सेशनमध्ये शाहरुखला अभिनेते आशुतोष राणा यांच्याबद्दल देखील प्रश्न विचारण्यात आला. आशुतोष राणा यांच्याबद्दल दिलेल्या उत्तरानं शाहरुखनं थेट आशुतोष यांच्या पत्नीचं म्हणजेच अभिनेत्री रेणूका शहाणे यांचं मन जिंकलं. असं काय म्हणाला शाहरुख पाहूयात.

शाहरुखचा पठाण सिनेमा येत्या  25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याआधी शाहरुख सिनेमाचं दणकून प्रमोशन करताना दिसतोय. कारण पठाणला टक्कर देण्यासाठी दुसऱ्याच दिवशी  26 जानेवारीला गांधी गोडसे सिनेमा रिलीज होणार आहे. आता कोणत्या सिनेमाला सर्वाधिक प्रतिसाद मिळतो हे पाहण्याची सर्वांना उत्सुकता आहे.

हेही वाचा – Shahrukh Khan: शाहरुखला बॉडी बनवण्यासाठी लागले इतके महिने;’पठाण’ची फी वाचून व्हाल थक्क

पठाणचं प्रमोशन करण्यासाठी शाहरुखचं ask SRK सेशनला चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. एका चाहत्यानं शाहरुखला या सेशनमध्ये अभिनेता आशुतोष राणा यांच्याविषयी तुझं काय म्हणणं आहे? असा प्रश्न विचारला. याचं उत्तर देत शाहरुखनं म्हटलं, ‘ते खूप चांगले अभिनेते आहेत. त्याशिवाय ते  ज्ञानी आणि अंतर्ज्ञानी आहेत’.

He is a Gyaani and Antaryaami apart from being a very very fine actor. https://t.co/ZobBv5sxpX

— Shah Rukh Khan (@iamsrk) January 12, 2023

शाहरुखनं आशुतोष राणाबद्दल व्यक्त केलेलं प्रेम पाहून अभिनेत्री रेणूका शहाणेनं ट्विट करत म्हटलं, ‘तुम्ही खरंच दयाळू, उदार आणि खरे व्यक्ती आहात’. रेणूका यांनी या ट्विटबरोबर हार्ट आणि आभार मानणारे इमोजी देखील शेअर केलेत.

@iamsrk you are unfailingly kind & generous & truthful 😊😊🙏🏾 https://t.co/SZk2qUeKh8

— Renuka Shahane (@renukash) January 12, 2023

अभिनेते आशुतोष राणा यांनी आजवर अनेक निगेटिव्ह भूमिका साकारल्या आहेत. शाहरुखच्या पठाण सिनेमातही आशुतोष राणा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.  सिनेमात ते कर्नल सुनील लूथरा ही भूमिका साकारणार आहेत.  तर शाहरुख सिनेमात एका रॉ एजंटची भूमिका साकारणार आहे.  सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सिनेमा रिलीज झाल्यानंतर प्रेक्षक सिनेमाला कसा प्रतिसाद देतात याकडे सर्वांचं लक्ष आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

1 thought on “आशुतोष राणाचं नाव घेताच बायको आली धावून; शाहरुख आणि रेणूका शहाणेचं ट्विट चर्चेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *