आम्ही लोकांसाठी काम करतो, म्हणून लोकांचा मोर्चा; विरोधकांना एकाच वाक्यात दिलं उत्तर..

आम्ही-लोकांसाठी-काम-करतो,-म्हणून-लोकांचा-मोर्चा;-विरोधकांना-एकाच-वाक्यात-दिलं-उत्तर.

सध्या राज्यात लोकांना जे पाहिजे तेच देणारे सरकार सत्तेत आहे. तसेच हे सरकार लोकांसाठी काम करत असतानाही विरोधकांकडून टीका केली जात.

मुंबईः शिंदे-फडणवीस सरकारविरोधात महामोर्चा काढून सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठविणाऱ्या महाविकास आघाडीविरोधात मुख्यमंत्र्यांनी जोरदार टीका केली आहे. याविषयी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, आम्ही लोकांसाठी काम करतो आहे. हे सरकार लोकांचे सरकार आहे त्यामुळे विरोधकांकडून महामोर्चा काढले जात आहेत. टीका केली जात आहे. आणि यामुळे राज्यात महामोर्चा काढले जात असल्याची टीकी एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

महाविकास आघाडीने शिंदे-फडणवीस सरकारविरोधात महामोर्चा काढल्यानंतर विरोधकांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका करताना महाविकास आघाडीच्या महामोर्चावर बोलताना म्हणाले की, आम्ही लोकांसाठी काम करत आहे.

त्यामुळे विरोधकांकडून मोर्चा काढला जात आहे. त्याचबरोबर टीका करण्याचीसुद्धा स्पर्धा लागली आहे अशी टीकाही करण्यात आली आहे.

सध्या राज्यात लोकांना जे पाहिजे तेच देणारे सरकार सत्तेत आहे. तसेच हे सरकार लोकांसाठी काम करत असतानाही विरोधकांकडून टीका केली जात. त्यामुळे सरकारवर आरोप-प्रत्यारोप करण्याची स्पर्धा लागली आहे असा जोरदार टोलाही लगावण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनााथ शिंदे यांनी आपल्या सरकारचे धोरण सांगताना ते म्हणाले की, हे लोकांचे लोकांसाठी सरकार आहे. त्यामुळे आमचा कोणातही अजेंडा नाही. तरीही विरोधकांकडून कायम टीका केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडीतील मित्र पक्षांनी सरकारविरोधात महामोर्चा काढून सध्याच्या राजकारणाविषयी निषेध व्यक्त केला. यावेळी त्यांनी छत्रपती शिवरायांबद्दलही अवमान करणाऱ्या नेत्यांविरोधात निषेध नोंदवण्यात आला.

त्यावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी विरोधकांकडे कोणताही मुद्दा नसल्यानेच त्यांच्याकडून असे मोर्चे काढले जात असल्याचे म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *