आम्ही त्यांच्या नाकाखालून सरकार घेऊन गेलो, देवेंद्र फडणवीस यांची टीका

मुंबई, 17 डिसेंबर : महाविकास आघीडने मुंबईत आज महामोर्चा काढला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांनी केलेलं वादग्रस्त वक्तव्य, फुले, आंबेडकर यांच्याबाबत चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने वाद निर्माण झाला होता. तसंच भाजप नेत्यांनी महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्ये केल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महामोर्चा काढला आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार यांच्यावर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्यांना स्वतः चे सरकार टिकवता आले नाही. त्यांच्या नाकाखालून आम्ही सरकार घेऊन गेलो. तसंच महाविकास आघाडीच्या मोर्चा हा केवळ राजकीय मोर्चा आहे. जे संतांना व वारकरी संप्रदायास शिव्या देतात, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला हे माहिती नाही, अशी लोक कुठल्या तोंडाने मोर्चा काढतात. महाराष्ट्राचे माणके आहेत त्यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य नको असं फडणवीस म्हणाले.
हेही वाचा : MVA Morcha : ‘त्यांना कायमचा धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही’, शरद पवार कडाडले
शिवसेनेला सवालफडणवीस यांनी म्हटलं की,” माझा शिवसेनेला सवाल आहे की, रोज स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान काँग्रेसने केला तेव्हा मोर्चा का नाही काढला? तीन पक्ष आज विसरले आहेत. कर्नाटक सीमावाद हा ६० वर्षांपासून आहे आणि यांनीच राज्य केले मात्र तोडगा काढला नाही. मुद्दे उरले नाहीत म्हणून राजकीय मोर्चा काढत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आमचे आदर्श आहेत.”
उद्धव ठाकरेंवर निशाणा
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी भाषणे लिहून ठेवण्यासाठी माणसे ठेवावीत असा टोला लगावला. ते म्हणाले की,”उद्धव ठाकरे यांची कॅसेट 10 वर्षे तिथेच अडकली आहे. भारताचे संविधान आहे. मुंबई कुणीही तोडू शकत नाही. त्यांच्या भाषणात मुद्दाच नाही. त्यांनी भाषण लिहून देण्यासाठी माणसं ठेवावी.”
हेही वाचा : मुंबई झाली महाविकास आघाडीमय, महामोर्चाला लाखोंची गर्दी
आम्ही नाकाखालून सरकार घेऊन गेलो
अजित पवार यांच्यावर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्यांना स्वतः चे सरकार टिकवता आले नाही. त्यांच्या नाकाखालून आम्ही सरकार घेऊन गेलो. आमचं हे सरकार टिकेल आणि पुढची निवडणूकसुद्धा आम्ही जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ड्रोन शॉट लायक मोर्चा
मोर्चावर टीका करताना फडणवीस म्हणाले की, तीन पक्ष असूनही छोटा मोर्चा काढला. आज कुणीही ड्रोन शॉट दाखवू शकले नाहीत. आज सगळे क्लोज शॉट दाखवले. ड्रोन शॉट लायक मोर्चाच नव्हता. आझाद मैदानावर या आम्ही म्हटले होते. पण मैदान भरणार नाही, हे माहिती होते म्हणून त्यांनी निमुळती जागा निवडली.
हेही वाचा : MVA Morcha : राज्यपालांची वेळीच हकालपट्टी करा, नाहीतर…, शरद पवारांचा केंद्राला थेट इशारा
भुट्टो आणि राहुल गांधी एकत्र कसे बोलतात?
देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. बिलावर भुट्टो आणि राहुल गांधी एकत्र कसे बोलतात? असा प्रश्न फडणवीस यांनी विचारला. ते म्हणाले की, बिलावर भुट्टो एका फेल राज्याचे मंत्री आहेत. ते आतंकवादी देशाचे मंत्री आहेत. पण भारताच्या पंतप्रधान यांच्यासोबत जेव्हा भुट्टो बोलले तेव्हा देशासाठी भुट्टोची निंदा करायला हवी होती पण त्यांनी नाही केले.
मोदींच्या काळात चीनला रोखले
भारताचा भूभाग जेव्हा चीनमध्ये गेला तेव्हा राहुल गांधी यांच्या घरातील व्यक्ती नेतृत्व केले होते. त्यामुळे राहुल गांधी यांना बोलण्याचा अधिकार नाही. मोदींच्या काळात तर चीनला रोखण्याचे काम केले आहे. एक इंच भारताची भूमी मोदींच्या काळात गेली नाही असंही फडणवीस म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.