लातूर : सोमनाथ काजळे
दिनांक:६ मार्च युवकांचे प्रेरणास्थान लातूर ग्रामीणचे लोकप्रिय आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त निलंगा विधानसभा युवक कॉंग्रेस पक्षाच्या वतीने देवणी येथे ६ एप्रिल रोजी मंगळवारी शासकिय ग्रामीण रूग्णालयात कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून अहोरात्र काम करणारे डॉक्टर, नर्स, आरोग्य सेवक, परिचारक यांचा सत्कार प्रदेश काँग्रेस सोशल मीडिया सरचिटणीस तथा पत्रकार हरिराम कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला दरम्यान रूग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना मास्क, सॅनिटायझर, फळे यांचे वाटप करण्यात आले यावेली निलंगा विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष गजानन भोपणीकर यांच्या उपस्थितीत kovid १९ चे नियम पाळून सुरक्षित अंतर ठेवून कार्यक्रम करण्यात आला.
यावेळी देवणी ग्रामीण शासकिय रुग्णालयातील वैद्यकीय डॉक्टर अँथोनी, तालुका काँग्रेस चे उपाध्यक्ष बालाजी वळसांगविकर, देवणी सेवादल कॉँग्रेसचे अध्यक्ष अमित मानकरी, देवणी नगर पंचायत गटनेते जावेद भाई येरोळे, देवणी तालुका युवक कॉंग्रेस अध्यक्ष राहुल बालुरे, गुर नाळ चे चेअरमन अंकुश बागवाले, लासो ना चे उपसरपंच अंकुश माने, सुभाष पाटील, नामदेव मुराळे, शिवाभाऊ कांबळे, जावेद तांबोळी, अमित सूर्यवंशी ज्ञानेश्र्वर सावंत , समीर उंटवाले, आशिष शिंदे, फैजल उंटवाले, फजील उंटवाले, उपस्थित होते.
