'आपण लवकरच मैत्रिणी होऊ चित्रूsss'; उर्फी जावेद पुन्हा वाघांच्या वाटेला

Urfi javed on Chitra Wagh : ‘आपण लवकरच मैत्रिणी होऊ चित्रूsss’; उर्फी जावेद पुन्हा वाघांच्या वाटेला
उर्फी जावेद
अभिनेत्री उर्फी जावेद हिनं पुन्हा एकदा भाजप नेत्या चित्रा वाघ यांना उद्देशून ट्विट केलं आहे. काय म्हणाली उर्फी पाहा.
- News18 Lokmat
- Last Updated :
- Mumbai, India
-
Published by: Minal Gurav
अभिनेत्री उर्फी जावेदच्या विचित्र फॅशन स्टाइलवर आता बीजेपीच्या निशाण्यावर आली आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीला बेड्या ठोकण्याची मागणी करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
उर्फीच्या कपड्यांवरून चित्रा वाघ यांनी ट्विट केल्यापासून उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यात ट्विटर वॉर सुरू आहे.
चित्रा वाघांच्या ट्विटवर उर्फीनं उत्तर देत, माझा वापर करून त्या चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं. त्याचप्रमाणे राज्यात इतर महिलांच्या विषयाकडे त्या का बघत नाही? असा प्रश्न देखील तिनं केला.
त्यानंतर उर्फी विरोधात अनेक राजकीय महिला नेत्यांची भाष्य केलं. अनेकांनी नाराजी व्यक्त केली. चित्रा वाघ यांनी उर्फी विरोधात मोर्चा देखील काढला होता.
त्यानंतर आता उर्फीनं पुन्हा एकदा ट्विट करत, ‘आपण लवकरच मैत्रिणी होऊ चित्रूsss’ असं म्हटलं आहे.
चित्रा वाघ यांना ‘चित्रू म्हणत’ उर्फी जावेद पुन्हा एकदा वाघांच्या वाटेला गेली आहे.
या ट्विटवर आता भाजप नेत्या चित्रा वाघ काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News, Urfi Javed