आधी साकारली सावत्र आई मग13 वर्षांनी श्रीदेवीनं त्याच अभिनेत्याबरोबर केला रोमान्स

मुंबई, 16 डिसेंबर : बॉलिवूडची चांदनी म्हणजेच दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीनं जगाला अलविदा म्हटलं असलं तरी चाहते आजही श्रीदेवीची आठवण काढतात. लाखो प्रेक्षक आजही श्रीदेवीच्या प्रेमात आहेत. श्रीदेवीबद्दल लहान लहान गोष्टी जाणून घेण्यासाठी तिचे चाहते आतूर असतात. श्री देवीनं फार लहान वयात तिच्या करिअरला सुरूवात केली होती. सुरुवातीच्या काळातच अनेक फिल्म मेकर्सनी श्री देवी हे नाव हिट होणार असं जाणलं होतं. तिचा अभिनय आणि तिच्या सौंदर्यानं तिनं लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. श्रीदेवीबद्दल अनेक किस्से समोर येत असतात. असाच एक किस्सा जो तिच्या करिअरशी निगडीत आहे तोच आज जाणून घेणार आहोत.
श्रीदेवीनं फार लहान वयात अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. पण पदार्पणातच तिला तिच्या वयापेक्षा मोठ्या व्यक्तींच्या भूमिका कराव्या लागल्या. श्रीदेवी ही बॉलिवूडची पहिली लेडी सुपरस्टार म्हणून ओळखली जाते. तिला लेडी अमिताभ म्हणूनही ओळखलं जायचं. श्रीदेवीचा जन्म 13 ऑगस्ट 1963 रोजी झाला. वयाच्या 13व्या वर्षी श्रीदेवीला साऊथ सुपरस्टार रजनीकांतच्या आईची भूमिका साकारली होती. 1976साली आलेल्या मूंदरू मुदिचु या सिनेमात श्रीदेवी रजनीकांतची सावत्र आई म्हणून दिसली होती.
हेही वाचा – केवळ मलायका-अर्जुनच नाही तर बॉलिवूडच्या ‘या’ जोड्यांच्या वयातील अंतर वाचून व्हाल चकित
मूंदरू मुदिचू सिनेमाची कथा फार रंजक होती. सिनेमात श्रीदेवी त्याची सावत्र आई दाखवण्यात आली होती. खरंतर श्रीदेवी आणि रजनीकांत यांच्यात वयाचं अंतर फार नव्हतं. सुरूवातीला दोघांची ओळख होते आणि रजनीकांत श्रीदेवीच्या प्रेमात पडतात. पण कथेत ट्विस्ट येतो आणि रजनीकांतच्या वडिलांना श्रीदेवीबरोबर लग्न करावं लागलं. या घटनेमुळे रजनीकांत नाराज होतात. मूंदरू मुदिचु हा तमिळ भाषेतील रोमँटिक सिनेमात होता. 22 ऑक्टोबर 1976साली सिनेमा प्रदर्शित झाला होता. तमिळ सिनेसृष्टीत सिनेमात प्रसिद्ध झाला होता.
मूंदरू मुदिचु या सिनेमानंतर जवळपास 13 वर्षांनी श्रीदेवी आणि रजनीकांत यांना पुन्हा एकत्र काम करण्याची संधी मिळाली. 1989मध्ये आलेल्या चालबाज या सिनेमात दोघांनी एकत्र काम केलं. सिनेमातील रजनीकांत आणि श्रीदेवीची जोडी चांगलीच गाजली. सिनेमात दोघे रोमान्स करताना दिसले. वयाच्या 13व्या ज्या अभिनेत्याच्या सावत्र आईची भूमिका केली त्याच अभिनेत्याबरोबर 13 वर्षांनी रोमँटिक सीन शुट केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.