आधी जावयाला जेलबाहेर काढा अन् मग एकनाथ शिंदेंवर आरोप करा; गुलाबराव पाटलांचा एकनाथ खडसेंवर हल्ला

आधी-जावयाला-जेलबाहेर-काढा-अन्-मग-एकनाथ-शिंदेंवर-आरोप-करा;-गुलाबराव-पाटलांचा-एकनाथ-खडसेंवर-हल्ला

News

  • मुख्यपृष्ठ
  • बातम्या &nbsp/ जळगाव
  • एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपांनंतर गुलाबराव पाटील संतापले; म्हणाले, आधी जावयाला जेलबाहेर काढा अन्…

एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपांनंतर गुलाबराव पाटील संतापले; म्हणाले, आधी जावयाला जेलबाहेर काढा अन्…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर एकनाथ खडसे यांनी केलेल्या आरोपांनंतर मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आता एकनाथ खडसेंवर (Eknath Khadse) हल्लाबोल केला आहे. 

Gulabrao patil allegation on eknath khadse on cm eknath shinde issue jalgaon maharashtra latest marathi news एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपांनंतर गुलाबराव पाटील संतापले; म्हणाले, आधी जावयाला जेलबाहेर काढा अन्...

Gulabrao patil allegation on eknath khadse

Jalgaon News Updates: जळगाव जिल्ह्यातील राजकारण सध्या चांगलंच तापलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर एकनाथ खडसे यांनी केलेल्या आरोपांनंतर मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आता एकनाथ खडसेंवर (Eknath Khadse) हल्लाबोल केला आहे. 

गुलाबराव पाटील म्हणाले की, भोसरी प्रकरण कोणी केलं, आपण काय संत आहेत का? आपलं बाळू आणि दुसऱ्याचं काळू असं कसं चालेल, असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील एकनाथ खडसेंना टोला लगावला आहे. पहिले आपल्या जावयाला सोडवा ते कोणत्या कारणावरून जेलमध्ये आहेत. त्यांना बाहेर काढा, ते का साधूसंत आहेत म्हणून जेलमध्ये आहेत का? तर कृपया करून त्यांनी आधी जावयाला बाहेर काढावे आणि मग एकनाथ शिंदेंवर आरोप करावा असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसेंवर निशाणा साधला आहे.

आमच्या एकनाथ शिंदे यांची गाडी सुसाट भाग रही हैं…

उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाच्या चाळीस आमदारांचं टायटॅनिक जहाज बुडेल अशी टीका केली होती. यावर बोलताना गुलाबराव म्हणाले की, कुणी खोके म्हणा कुणी जहाज म्हणा मात्र आमच्या एकनाथ शिंदे यांची गाडी सुसाट भाग रही हैं, असे असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना जोरदार उत्तर दिलं आहे.

News Reels

राज्यपाल यांनी जे वक्तव्य केलं आहे ते चुकीचे वक्तव्य आहे. त्या वक्तव्याला मी मान्यता दिलेली नाही, असे म्हणत राज्यपाल यांच्यावर बोलणारे सर्वात पहिले आम्ही होतो असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्या टीकेला जोरदार उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले होते एकनाथ खडसे 

एकनाथ खडसे यांनी म्हटलं होतं की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कारवाई होईल असे मला वाटत नाही, हे निगरगठ्ठ  सरकार आहे. नैतिकतेच्या आधारावर उभे राहिलेले नाही .  त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देतील असं वाटत नाही, मात्र जोपर्यंत एकनाथ शिंदे राजीनामा देत नाही तोपर्यंत आम्ही तो मागतच राहणार असा इशारा हे एकनाथ खडसेंनी दिला आहे. माझ्यावर भूखंड गैरव्यवहाराचे आरोप झाले, मात्र त्याच्याशी माझा दुरान्वयेही संबंध नव्हता. तरीसुद्धा मला नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, असं भाग पाडण्यात आले. मी राजीनामा दिला, त्यामुळे चौकशीतून जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा, असं खडसेंनी म्हटलं होतं. 

Published at : 25 Dec 2022 04:05 PM (IST) Tags: jalgaon eknath khadse marathi news CM Eknath Shinde ‘Maharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *