आधी चोरलं विमान नंतर वॉलमार्ट उडवण्याची धमकी! अमेरिकेत पुन्हा 9/11 घडण्याची भीती

आधी-चोरलं-विमान-नंतर-वॉलमार्ट-उडवण्याची-धमकी!-अमेरिकेत-पुन्हा-9/11-घडण्याची-भीती

मिसिसिपी, 3 सप्टेंबर : अमेरिकेत पुन्हा एकदा 9/11 होण्याची भिती निर्माण झाली आहे. कारण, मिसिसिपी येथे एका व्यक्तीने विमानाचे अपहरण केले आहे. विमान चोरल्यानंतर ते वॉलमार्टमध्ये क्रॅश करण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धमकी देणाऱ्या व्यक्तीचे वय 29 वर्षे आहे. या धमकीनंतर खबरदारी म्हणून सर्व वॉलमार्ट बंद करण्यात आले आहेत. ज्या व्यक्तीने विमान चोरले तो विमानतळाचाच कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी त्याच्याशी संपर्क साधून पोलीस त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याने दुहेरी इंजिन असलेले 9 आसनी विमान चोरलं आहे.

सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ते म्हणाले, “त्यांना पहाटे 5 वाजता चुकीच्या पायलटने तुपेलो, मिसिसिपी येथे विमान उड्डाण केल्याबद्दल सूचना मिळाली होती,” या पायलटने 911 वर कॉल केला आणि वॉलमार्ट येथे विमान क्रॅश करण्याची धमकी दिली. ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये हे विमान संपूर्ण परिसरात बेदकारपणे उड्डाण करत असल्याचे दिसून येते. या घटनेनंतर नागरिकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिस्थिती वेगाने बिघडण्याची शक्यता आहे.

Currently we have a 29yr old who stole this plane & is threatening to crash it into something. Polices ,ambulances ,& fire trucks are everywhere. Everything is shutdown rn pic.twitter.com/AzebdIa3tP

— City King (@CityKing_Gank_) September 3, 2022

परिसर रिकामा

पोलिसांनी सांगितले की वॉलमार्ट आणि त्याच्या लगतची दुकाने रिकामी करण्यात आली आहेत जेणेकरुन लोकांना शक्य तितका आपला बचाव करता येईल. पोलीस अधिकाऱ्यांनी पायलटशी थेट बोलणे सुरू केल्याचे सांगितले जात आहे. तुपेलो पोलीस विभागाने सांगितले की वॉलमार्ट आणि जवळचे स्टोअर रिकामे करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, विमानाने संध्याकाळी 5 च्या सुमारास चक्कर मारण्यास सुरुवात केली आणि 3 तासांहून अधिक काळ लोटल्यानंतरही ते हवेत होते. राज्याचे कायदे अंमलबजावणी आणि आपत्कालीन व्यवस्थापक परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. सर्व नागरिकांनी सतर्क राहावे, अशी माहिती मिसिसिपीचे गव्हर्नर टेट रीव्ह्स यांनी दिली.

वॉलमार्ट काय आहे?

वॉलमार्ट स्टोअर्स कॉर्पोरेशन ही एक अमेरिकन कंपनी आहे जी आता जगातील सर्वात मोठी रिटेल कंपनी बनली आहे. त्यांची वार्षिक उलाढाल कोट्यवधींची आहे. ही जगातील प्रसिद्ध खाद्य आणि पेये विकणारी कंपनी आहे. वॉलमार्टने जगातील अनेक देशांमध्ये स्वत:ला सिद्ध करून आपला व्यवसाय पसरवला आहे. या कंपनीत 21 लाखांहून अधिक लोक काम करतात यावरून त्याची लोकप्रियता लक्षात येते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *