आधी काढली खरडपट्टी अन् आता त्याच ब्रॅण्डच्या प्रमोशनसाठी रस्त्यावर उतरली अनुष्का

मुंबई, 21 डिसेंबर : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात.नुकतीच ती ‘पुमा’ या स्पोर्ट्स वेअर ब्रॅंडमुळे चर्चेत आली होती. ‘पुमा’ या स्पोर्ट्स वेअर ब्रॅंडने अनुष्काची परवानगी न घेता तिचे काही फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले होते. ही गोष्ट अनुष्काच्या निदर्शनास आल्यानंतर तिने आपला संपात व्यक्त करत त्या कंपनीला ते फोटो हटवायला सांगितले. या प्रकरणावरून लोकांना वाटले की अनुष्का या ब्रँडची बदनामी करत आहे. मात्र नंतर हा फक्त पब्लिसिटी स्टंट असल्याचे समोर आले. आता ती पुन्हा चर्चेत आली असून आता मात्र तिला नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागत आहे.
अनुष्का शर्मा तिच्या ‘चकडा एक्सप्रेस’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटासाठी ती खूप मेहनत घेत आहे. या चित्रपटात ती क्रिकेटर झुलन गोस्वामीच्या भूमिकेत दिसणार आहे. या बायोपिकमध्ये काम करण्यासाठी तिने क्रिकेटरप्रमाणे प्रशिक्षणही घेतले आहे. दरम्यान, आता अनुष्काचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती मुंबईच्या रस्त्यांवर याच ब्रँडचे प्रमोशन करताना दिसत आहे.
हेही वाचा – Shahrukh khan: ‘मला अभिनयातलं जे कळत नाही…’ अन शाहरुखने लेकीकडे केली ही खास मागणी
अनुष्का शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये ती एका ब्रँडचे प्रमोशन करत असल्याचे दिसत आहे, मात्र तिच्यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक जाम होत आहे. यावरून नेटकऱ्यांनी तिची चांगलीच खरडपट्टी काढली. अनुष्का शर्माने मुंबईतील वांद्रे भागात क्लासिक कारमध्ये बसून या ब्रँडची जाहिरात केली. यादरम्यान त्याला पाहण्यासाठी चाहत्यांचीही गर्दी झाली होती. यासोबतच पापाराझीही तिचे फोटो आणि व्हिडिओ शूट करताना दिसत होते. वांद्र्याच्या लिंकिंग रोडवर अनुष्का गाडीवर बसून प्रचार करत होती. तिची कार अतिशय धीम्या गतीने जात होती आणि चाहत्यांनी देखील अनुष्काला पाहण्यासाठी या कारभोवती गराडा घातला होता.
लिंकिंग रोड हा बांद्रा भागातील सर्वात वर्दळीचा रस्ता मानला जातो. अशा स्थितीत वाहतूक कोंडी होणे साहजिकच आहे. पापाराझी विरल भयानीने संपूर्ण प्रमोशनचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अनुष्काच्या गाडीच्या मागून किती वाहनांचे हॉर्न येत आहेत हे दिसत आहे. ट्रॅफिक जॅममुळे संतापलेल्या या लोकांनी तिला चांगलेच सुनावले आहे. इतकंच नाही तर हा व्हिडिओ समोर आल्यानंतर युजर्सनी सोशल मीडियावरही त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली.
या व्हिडिओ पोस्टच्या कमेंटमध्ये एका यूजरने लिहिले की, “संपूर्ण लिंकिंग रोड जाम झाला होता.. अनावश्यक ट्रॅफिक झाले होते.” आणखी एका युजरने लिहिले की, “पोलिस या लोकांना काहीही बोलत नाहीत. पूर्ण वाहतूक कोंडी झाली होती. दुसर्या यूजरने लिहिले, “हे काय आहे? ते हे सर्व का करतात आणि जनता विनाकारण वेडी होत आहे. दुसऱ्या युजरने लिहिले की, “लिंकिंग रोड खूपच खराब आहे आणि त्यावर ट्रॅफिक जाम आहे.” अशा प्रकारे अनुष्काला ट्रोल केलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.