आधी अपहरण करुन अत्याचार; नंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत सामूहिक बलात्कार

आधी-अपहरण-करुन-अत्याचार;-नंतर-फोटो-व्हायरल-करण्याची-धमकी-देत-सामूहिक-बलात्कार

पुणे, 28 डिसेंबर : अल्पवयीन मुलीवर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने पुणे शहर पुन्हा एकदा हादरले आहे. आधी चाकूचा धाक दाखवून या मुलीचं अपहरण केलं आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिचे नग्न अवस्थेतील फोटो काढून हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन सहा आरोपींनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. या प्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अल्पवयीन मुलीवर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक घटनेने पुणे हादरलं आहे. ओम राजू तिंबोळे (रा. जय गणेश कॉलनी, विधाते वस्ती, औंध), जय राजु तिंबोळे, अनिल जाधव, सुनिल जाधव, शुभम आणि किरण जावळे (सर्व रा. औंध) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही घटना विशालनगर येथील लॉजवर, बाणेर येथील तुकाई मंदिर टेकडी तसेच औंधमध्ये घडली. जुलै 2022 ते 23 डिसेबर 2022 दरम्यान घडली आहे. सहाही आरोपींवर पोलिसांनी पॉक्सोसह अनुसूचित जाती जमाती अधिनियमानुसार (अॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे.

वाचा – प्रेयसीचा एक रात्र हॉटेलमध्ये थांबण्यास नकार; रागात प्रियकराचं राक्षसी कृत्य

मुलीला त्रास होऊ लागल्याने घटना उघड

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल जाधव या व्यक्तीने 15 वर्षीय मुलीला चाकूचा धाक दाखवला. मुलीला घाबरवलं आणि तिचं अपहरण केलं. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. तिचे नग्न अवस्थेतील फोटो काढून ते फोटो आपल्या मित्रांना पाठवले. त्यानंतर तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तिला वेगवेगळ्या ठिकाणी बोलवून तिच्यावर अत्याचार केले. 23 डिसेंबर रोजी दुपारी तिला एका ठिकाणी बोलावून सहा जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या बलात्कारानंतर मुलीला त्रास होऊ लागल्याने ही घटना आईच्या लक्षात आली. आईने थेट पोलिसांत धाव घेतली आणि पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी 6 जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *