आत्महत्येच्या काही वेळ आधीच तुनिषाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली अन्…

आत्महत्येच्या-काही-वेळ-आधीच-तुनिषाने-इन्स्टाग्रामवर-पोस्ट-केली-अन्…

मुंबई, 24 डिसेंबर : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केली आहे. टीव्ही सीरियलच्या सेटवरच तुनिषाने गळफास लावून आयुष्य संपवलं. सेटच्या मेकअप रूममध्ये असलेल्या पंख्याला गळफास लावून तुनिषाने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्याआधी काही तास आधी तुनिषाने एक इन्स्टाग्राम पोस्ट केली होती. ही पोस्ट पाहिली तर ती नैराश्येत किंवा तणावात असल्याचं वाटत नव्हतं, उलट तिची ही पोस्ट आशावादी दिसत होती.

या पोस्टमध्ये ती जे पॅशनने प्रेरित आहेत, ते कधीच थांबत नाहीत, असं म्हणलं आहे. मुख्य म्हणजे तुनिषाने सेटवरूनच हा फोटो पोस्ट केला आहे. वैयक्तिक आयुष्यात तुनिषा तणावात किंवा नैराश्येत होती का? याचा तपास पोलिसांना करायचा आहे.

तुनिषाने गळफास लावल्याचं समजल्यानंतर सेटवर असलेल्यांनी पोलिसांना बोलावलं, तसंच तुनिषाला रुग्णालयातही नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

कोण होती तुनिषा शर्मा?

तुनिषा शर्माने अलिबाबा दास्तान ए काबूल या सीरियलमध्ये शेहजादी मरियमची भूमिका निभावली होती. 20 वर्षांच्या तुनिषाने भारत का वीरपूत्र- महाराणा प्रताप या सीरियलमधून पदार्पण केलं होतं. चक्रवर्तीण अशोक सम्राट, गब्बर पुंछवाला, शेर ए पंजाब महाराजा रणजीत सिंग, इंटरनेट वाला लव्ह आणि इश्क सुभान अल्लाह या शो मध्येही अभिनय केला.

टीव्ही सीरियलशिवाय तुनिषाने फितुर, बार बार देखो, कहानी-2 दुर्गा राणी सिंग आणि दबंग-3 या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या फितुर आणि बार बार देखो मध्ये तुनिषाने लहान कतरिना कैफ निभावली होती. सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या दबंग-3 मध्येही तुनिषाने छोटी भूमिका केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *