आजारी अमृतासाठी प्रसाद जवादेचा खास सल्ला;दोघांच्या केमिस्ट्रीची पुन्हा चर्चा

मुंबई, 25 जानेवारी- ‘बिग बॉस मराठी’ चा चौथा सीजन नुकताच पार पडला. दरवर्षीप्रमाणे यंदाचा सीजनदेखील प्रचंड गाजला. या सीजनमध्येसुद्धा अनेक राडे, मैत्री, प्रेम पाहायला मिळाले. नुकतंच या सीजनने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. अभिनेता-स्पर्धक अक्षय केळकर या पर्वाचा विजेता ठरला. मात्र आणखी दोन स्पर्धक असे आहेत ज्यांची तुफान चर्चा झाली. इतकंच नव्हे तर प्रेक्षकांनी या दोघांना पब्लिक विनरदेखील घोषित करुन टाकलं होतं. हे दोन लोकप्रिय स्पर्धक म्हणजे अभिनेत्री अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे होय.
यंदाच्या सीजनमध्ये सहभागी झालेल्या अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे या स्पर्धक कलाकरांना मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. आपल्या दमदार खेळीने या दोघांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. बिग बॉस दरम्यान हे दोन्ही स्पर्धक सतत सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसून यायचे त्यामुळे त्यांच्यापैकी एक विजेता होणार असं अनेकांना वाटायचं. मात्र त्यांच्या अचानक एलिमिनेशनने सर्वांनाच धक्का बसला होता.
(हे वाचा;Amruta Deshmukh-Akshay Kelkar: ‘लिहिताना त्रास होत आहे पण…’ अमृता देशमुखने अक्षय केळकरसाठी लिहलं पत्र )
बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीजनचा महाअंतिम सोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला. अभिनेता अक्षय केळकर या पर्वाचा विजेता ठरला. परंतु यादरम्यान अमृता आणि प्रसाद जवादेची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली. अमृता आणि प्रसाद शो संपल्यानंतरसुद्धा चर्चेत आहेत. सतत सोशल मीडियावर चाहते त्यांच्याशी संवाद साधण्याचा आणि त्यांच्याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रसाद आणि अमृता ही जोडी बिग बॉसच्या घरात प्रचंड लोकप्रिय झाली होती. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडली होती. या दोघांच्या नावाने सोशल मीडियावर अनेक हॅशटॅग्ससुद्धा पाहायला मिळाले होते.
अमृता देशमुख पोस्ट-
अमृता देशमुख सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. अमृता सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत प्रेक्षकांच्या संपर्कात असते. दरम्यान अभिनेत्रीने नुकतंच आपला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबतच प्रसाद जवादेची कमेंट चर्चेत आली आहे. अमृताने शेअर केलेल्या फोटोमध्ये अमृता नाक पुसताना दिसून येत आहे. अर्थातच अमृता आजारी असल्याचं या फोटोवरुन लक्षात येत आहे. या फोटोला कमेंट करत प्रसाद जवादेने लिहलंय, ‘तथ्यात्मक पोस्ट… कृपया काळजी घे’.
प्रसाद जवादेच्या या कमेंट्समुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. कारण बिग बॉसच्या घरात या दोघांमध्ये नक्की कायतर शिजतंय असं म्हटलं जायचं. या दोघांनी नेहमीच आम्ही चांगले मित्र असल्याचं सांगितलं आहे. मात्र प्रेक्षकांना या दोघांना एकत्र पाहायला प्रचंड आवडतं. शोनंतरसुद्धा प्रसाद आणि अमृताची केमिस्ट्री प्रचंड चर्चेत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.