Home » आंतरराष्ट्रीय » हवाई प्रवास होऊ शकतो महाग, ATFची किंमत पोहोचली विक्रमी पातळीवर

हवाई प्रवास होऊ शकतो महाग, ATFची किंमत पोहोचली विक्रमी पातळीवर

हवाई-प्रवास-होऊ-शकतो-महाग,-atfची-किंमत-पोहोचली-विक्रमी-पातळीवर

16 मार्च रोजी एटीएफच्या किमती तब्बल 18.3 टक्क्यांनी वाढल्या होत्या. त्यानंतर 1 एप्रिलला त्याच्या किमतीत दोन टक्क्यांनी वाढ करण्यात आली. मात्र, ताज्या दरवाढीनंतर, मुंबईत ATF ची किंमत आता प्रति किलोलिटर 1,11,981.99 रुपये झाली आहे.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  नवी दिल्ली, 16 एप्रिल – विमानाने प्रवास करणं आता महाग होऊ शकतं. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत असताना शनिवारी विमानात इंधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या एटीएफ (Aviation Turbine Fuel) च्या किमतीतही 0.2 टक्क्यांनी वाढ करण्यात आली. यावर्षी एटीएफच्या किमतीत झालेली ही सलग आठवी वाढ आहे. सार्वजनिक तेल कंपन्यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, एटीएफच्या किमतीत 277.5 रुपये प्रति किलोलीटर म्हणजेच 0.2 टक्के वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीनंतर राजधानी दिल्लीत एटीएफच्या किमती 1,13,202.33 रुपये प्रति किलोलीटरवर गेल्या आहेत. अशा प्रकारे एटीएफची किंमत विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. सलग दहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालेली नाही दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलचे दर सलग दहाव्या दिवशीही कायम आहेत. पहिल्या दोन आठवड्यात पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीच्या किमती प्रतिलिटर 10-10 रुपयांनी वाढल्या होत्या. महत्त्वाची बाब म्हणजे, विमान इंधनाच्या किमती प्रत्येक महिन्याच्या 1 आणि 16 तारखेला अपडेट केल्या जातात. तर तेल कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज बदलण्याचं स्वातंत्र्य आहे. 16 मार्चला रोजी एटीएफच्या किमतीत 18.3 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती 16 मार्च रोजी एटीएफच्या किमती तब्बल 18.3 टक्क्यांनी वाढल्या होत्या. त्यानंतर 1 एप्रिलला त्याच्या किमतीत दोन टक्क्यांनी वाढ करण्यात आली. मात्र, ताज्या दरवाढीनंतर, मुंबईत ATF ची किंमत आता प्रति किलोलिटर 1,11,981.99 रुपये झाली आहे. तर कोलकात्यात त्याची किंमत 1,17,753.60 रुपये आणि चेन्नईमध्ये 1,16,933.49 रुपये प्रति किलोलीटर झाली आहे. हे वाचा – तुरुंगातील ‘महिले’सोबत संबंध ठेवून गरोदर राहिल्या 2 कैदी? अजब घटनेमुळे खळबळ तेलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी 85 टक्के आयातीवर अवलंबून असलेल्या भारतातील पेट्रोलियम उत्पादनांच्या किमतीत नुकतीच झालेली वाढ हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीचा परिणाम आहे. याशिवाय, महामारीतून सावरणाऱ्या अर्थव्यवस्थेतही तेलाची मागणी वाढत आहे. हे वाचा – किवमधलं भयानक वास्तव, रस्त्यावर सापडला 900 हून अधिक मृतदेहांचा खच यावर्षी एटीएफच्या किमतीत आठवी वाढ एटीएफच्या किमतीचा वाटा एअरलाइनच्या ऑपरेटिंग खर्चाच्या सुमारे 40 टक्के आहे. यावर्षी देखील यात वाढ झाली आहे. या वर्षी आतापर्यंत झालेल्या आठ दरवाढीमध्ये एटीएफच्या किमती 39,180.42 रुपये प्रति किलोलीटरने वाढल्या आहेत.

  Published by:Digital Desk

  First published:

  मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  Tags: Airplane, Airport

  Leave a Reply

  Your email address will not be published.

  You may have missed