Home » आंतरराष्ट्रीय » घरात बसून 3 मुलांची आई महिन्याला कमावते 9 लाख; मात्र कुटुंबीयांचा आक्षेप

घरात बसून 3 मुलांची आई महिन्याला कमावते 9 लाख; मात्र कुटुंबीयांचा आक्षेप

घरात-बसून-3-मुलांची-आई-महिन्याला-कमावते-9-लाख;-मात्र-कुटुंबीयांचा-आक्षेप

नवी दिल्ली, 5 एप्रिल : जेव्हा आईवर मुलांची जबाबदारी असते अशावेळी ती काहीही करू शकते. प्रत्येक क्षणी आपल्या मुलांच्या सुरक्षेला प्राथमिकता देते. तीन मुलांच्या आईनेही तेच केलं जी परिस्थितीची मागणी होती. मात्र यासाठी तिला आपल्या कुटुंबाचा राग पत्करावा लागला. 42 वर्षीय लिसा टोल तीन मुलांची आई आहे. तिच्यासमोर जेव्हा जेवणाची भ्रांत होती, त्यावेळी तिने खूप प्रयत्न केले, मात्र काहीच होऊ शकलं नाही. अशीवेळी तिने अडल्ट इंडस्ट्रीची मदत घेतली. 3 मुलांनंतर या क्षेत्रात तिचा कसा टिकाव लागणार हा प्रश्न तिच्यासमोर आ वासून उभा होता. मात्र केवळ तिला पसंतच केलं जात नाही तर अडल्ट साइट OnlyFans वर त्यांच्या बोल्ड फोटोसाठी चांगली रक्कम द्यायला तयार होतात. कोरोना काळात नोकरी गेली, व्यवसाय डुबला… कोरोना काळात जेव्हा अख्खं जग हादरलं होतं, त्यादरम्यान लिसाचा व्यवसाय देखील उद्ध्वस्त झाला होता. नोकरीदेखील गेली. यानंतर समोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलं. यातून बाहेर येण्यासाठी तिने खूप प्रयत्न केले, मात्र काहीच शक्य होत नव्हतं. एकेदिवशी तिने एका महिलेला OnlyFans वर काम करून चांगले पैसे कमावत असल्याचं पाहिलं, ज्यानंतर तिला हिम्मत आली. यानंतर तिने तेथे प्रयत्न केला. तिसऱ्या मुलाच्या जन्मानंतर महिलेने हे काम सुरू केलं होतं आणि तिचे फोटोही लोकांना आवडत होते. हे ही वाचा-भयंकर! टिकली लावली म्हणून पोलीस अधिकाऱ्याने प्राध्यापिकेला रोखलं; बाईकने चिरडण्याचा केला प्रयत्न मुलांचा सांभाळ करण्यासाठी उतरली या क्षेत्रात.. लिसाच्या फॅन्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लोक तिचं कौतुक करू लागले. यामुळे लिसाचा आत्मविश्वास वाढला. यानंतर तिने हाच फुल टाइम जॉब म्हणून स्वीकरला. लिसा अडल्ट साइट ओन्ली फॅन्सकडून प्रत्येक महिन्याला तब्बल 9 लाख रुपये कमावते. मात्र लिसाच्या कुटुंबीयांना हे काम अजिबात आवडत नाही. बोल्ड फोटो विकून पैसे कमावण्याची पद्धत त्यांना आवडत नाही.

Published by:Meenal Gangurde

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.