Home » आंतरराष्ट्रीय » रशिया युक्रेनमध्ये आतापर्यंत का जिंकला नाही? 5 पॉईंट्समध्ये समजून घ्या

रशिया युक्रेनमध्ये आतापर्यंत का जिंकला नाही? 5 पॉईंट्समध्ये समजून घ्या

रशिया-युक्रेनमध्ये-आतापर्यंत-का-जिंकला-नाही?-5-पॉईंट्समध्ये-समजून-घ्या

Zelensky & Putin

5-Points Analysis Russia-Ukraine War : युक्रेनवरील हल्ल्याच्या वेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin) यांनी राष्ट्राला दिलेल्या संदेशात, त्यांना तेथील लोकांना नव-नाझीवादी राजवटीपासून मुक्त करायचे आहे असं लिहलं होतं. मात्र, यावेळी ते विसरले की युक्रेनचे विद्यमान अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Ukraine President Volodymyr Zelensky) हे स्वतः ज्यू आहेत.

पुढे वाचा …

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  मॉस्को, 24 मार्च : पूर्ण एक महिना उलटला तरी रशिया-युक्रेनमधील युद्ध (Russia-Ukraine War) अजूनही सुरू आहे. जगातील सर्वात बलाढ्य सैन्यांपैकी एक असलेल्या रशियन लष्कराने (Russian Army) पूर्ण ताकदीनिशी हल्ला करूनही युक्रेन या छोट्या शेजारी देशाचा ताबा अद्याप मिळवता आलेला नाही. रशियाच्या लष्करी रणनीतीकारांनी युक्रेनची (Ukraine) राजधानी कीव (Kyiv) जास्तीत जास्त 1 आठवड्यात काबीज करण्याची रणनीती आखली होती, असे सांगितले जात आहे. अशा स्थितीत प्रश्न पडतो की अशी कोणती कारणे आहेत, ज्यांनी रशियाला इतके दिवस थांबवले? चला 5 पॉईंट्स (5 Points Analysis) मध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया. प्रतिकार आणि परिस्थितीचा अंदाज घेण्यात चूक, तयारीचा अभाव युक्रेनवर रशियन हल्ल्यापूर्वी (Russia Attack on Ukraine) रशियाने जवळपास दीड लाख सैनिकांची फौज सीमेवर बराच काळ तैनात केली होती. असे दिसते की रशियाने युक्रेनवर हल्ला करण्यासाठी बरीच तयारी केली होती. पण जेव्हा हल्ला झाला तेव्हा असे दिसून आले की रशियन सैन्य (Russian Army) युक्रेनच्या लष्करी तळांऐवजी नागरी भागांवर हल्ले करत आहेत. युक्रेनमधील बर्फवृष्टीमध्ये त्यांची लष्करी वाहने अनेक ठिकाणी अडकताना दिसली. एवढेच नाही तर युक्रेनने प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात रशियाच्या (Russia) सैनिकांचे मोठं नुकसान झालं, त्यांना बंदी बनवण्यात आले. यावरून हे स्पष्ट झाले की रशियाने युक्रेनच्या प्रतिकाराचा आणि परिस्थितीचा अचूक अंदाज लावला नव्हता. रशियन सैन्याची तयारी दीर्घ युद्धासाठी नव्हती. नाटो एकता आणि प्रतिक्रियांचे योग्य मूल्यांकन झाले नाही रशियाने युक्रेनवर हल्ला (Russia Attack on Ukraine) करण्यापूर्वी गेल्या वर्षी अमेरिकेने अफगाणिस्तानातून माघार घेतली होती. तेथे तालिबान (Taliban) आणि दहशतवाद्यांचे आव्हान असतानाही त्यांच्या सैन्याला माघारी बोलावण्यात आले. एवढेच नाही तर ज्यो बायडेन (Joe Biden) यांच्या आधी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (US President) होते तेव्हा युरोपीय संघातील अनेक देशांशी अमेरिकेचे संबंध चांगले नव्हते. नरम-गरम संबंध असलेल्यांमध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखालील लष्करी आघाडी नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) चे सदस्य देश होते. यावर, युरोपियन युनियन (EU) चे जवळजवळ सर्व देश कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्याच्या बाबतीत रशियावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. ही वस्तुस्थिती पाहता नाटोचे सदस्य देश युक्रेनच्या मदतीसाठी पुढे येणार नाहीत, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin) यांना वाटत होते. इतर EU देश देखील त्याच्या मदतीपासून दूर राहतील. पण त्याचे मूल्यांकन चुकीचे निघाले. गेल्या एक महिन्यापासून अमेरिकेच्या नेतृत्वाखालील कोणताही देश युक्रेनच्या बाजूने थेट युद्ध पुकारत नसला तरी रशियाशी स्पर्धा करण्यासाठी त्याला सर्वतोपरी मदत करत आहे. अपेक्षेपेक्षा जास्त तीव्र आंतरराष्ट्रीय दबावाने रशियाला धक्का बसला रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याला आंतरराष्ट्रीय समुदाय (International Community) प्रत्युत्तर देईल अशी अपेक्षा असावी. पण तो इतका धारदार असेल याची बहुधा त्याला कल्पना नव्हती. सध्या जगातील सर्व देशांनी रशियातील सुमारे 400 अब्जाधीशांची खाती, त्यांचे व्यवहार आणि त्यांच्या व्यवसायावर बंदी घातली आहे. रशियन बँका आणि इतर वित्तीय संस्थांची मालमत्ता जप्त केली आहे. परिणामी पैसे आणि व्यवहार अडकले आहेत. रशियाच्या परकीय चलन निधीवर बंदी घालण्यात आली आहे. जगातील अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी रशियामधून आपला व्यवसाय काढून घेतला आहे किंवा त्यांचे कामकाज बंद केले आहे. दुसरीकडे, युक्रेनला खूप आंतरराष्ट्रीय पाठिंबा आणि सहानुभूती आहे. हे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या अंदाजाच्या अगदी विरुद्ध असल्याचे सिद्ध झाले आहे. रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमध्ये एका रशियन महिला पत्रकाराचा मृत्यू रशियाने जो ठसा निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्याचाही उलटसुलट परिणाम झाला युक्रेनवरील हल्ल्याच्या वेळी, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin) यांनी राष्ट्राला दिलेल्या संदेशात, त्यांना तेथील लोकांना नव-नाझीवादी राजवटीपासून मुक्त करायचे आहे. परंतु यावेळी ते विसरले की युक्रेनचे विद्यमान अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Ukraine President Volodymyr Zelensky) हे स्वतः ज्यू आहेत. त्यांच्या कुटुंबाने स्वतः नाझी राज्यकर्त्यांचे अत्याचार सहन केले आहेत. त्याच्या आजोबांच्या भावाला नाझींनी ज्यूंच्या हत्याकांडात मारले. इतकेच नाही तर हल्ल्यानंतरही झेलेन्स्की वारंवार रशियन प्रचारयंत्रणेवर (Russian Propoganda Machinery) वरचढ ठरले. कधी लष्कराच्या गणवेशात राष्ट्रपती भवनातून तर कधी लष्करी बंकरमधून स्वत:चे व्हिडीओ बनवून ते स्वत: प्रसिद्ध केले. यामुळे युक्रेनची संपूर्ण जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली. उलटपक्षी रशियन प्रचार यंत्रणा जगातील सर्वात मजबूत मानली जाते. रशियाला युक्रेनच्या सैन्याकडून तीव्र प्रतिक्रियेचा अंदाजही नव्हता रशियन हल्ल्याला युक्रेनच्या लष्कराने (Ukraine Army) ज्या प्रकारे प्रत्युत्तर दिले, ते रशियन लष्करालाही अपेक्षित नव्हते. युक्रेनचे सैन्य टँक नष्ट करण्यासाठी अचूक शस्त्रे असलेल्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागले गेले आहे. त्यात अमेरिकन जेव्हलिन मिसाईल लाँचर्स तसेच तुर्कीचे प्रभावी लढाऊ ड्रोन आहेत. याशिवाय रशियन सैन्याकडून कोणत्या रणनीती अवलंबल्या जाऊ शकतात याचीही कल्पना त्यांना आहे. कारण युक्रेनचे सैन्य (Ukraine Army) 2014 पासून आपल्या डोनबास प्रांतात रशियन सैन्याचं (Russian Army) समर्थन असलेल्या फुटीरतावाद्यांशी सतत लढत आहे. म्हणजेच ते रशियन लष्कराच्या प्रत्यक्षच नव्हे तर अप्रत्यक्ष धोरणांनाही चोख प्रत्युत्तर देत आहे. केवळ युक्रेनचे सैनिकच नाही तर सामान्य नागरिकही आपला देश वाचवण्यासाठी कठोर परिश्रम करत आहेत, ज्यांचा आत्मा अजूनही रशियन सैन्याला समजलेला नाही.

  Published by:Rahul Punde

  First published:

  मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  Tags: Russia Ukraine, Vladimir putin

  Leave a Reply

  Your email address will not be published.