Home » आंतरराष्ट्रीय » धक्कादायक! लिफ्टमध्ये मालकिणीसोबत…; पाळीव श्वानाचं भयंकर कृत्य CCTV मध्ये कैद

धक्कादायक! लिफ्टमध्ये मालकिणीसोबत…; पाळीव श्वानाचं भयंकर कृत्य CCTV मध्ये कैद

धक्कादायक!-लिफ्टमध्ये-मालकिणीसोबत…;-पाळीव-श्वानाचं-भयंकर-कृत्य-cctv-मध्ये-कैद

बोगोटा, 24 मार्च : श्वानाला प्रामाणिक प्राणी मानलं जातं. श्वान आपल्या मालकाच्या घराची, मालकाची सुरक्षा करतं. वेळप्रसंगी आपला जीव धोक्यात घालून मालकाचा जीव वाचवतं. मालकासाठी आपला जीवही देणारे असे श्वान तुम्ही फिल्ममध्ये पाहिले असतील. प्रत्यक्षातही ते असंच करतात. पण शेवटी तो एक प्राणीच. त्याचा स्वभाव कधी बदलेल सांगू शकत नाही. असाच एक भयानक व्हिडीओ समोर आला आहे. तुम्हीही कुत्रा पाळत असेल तर हा व्हिडीओ नक्कीच पाहायला हवा (Dog Attacks Owner). एका श्वानाने आपल्या मालकिणीवर जीवघेणा हल्ला केला आहे. त्याचं हे भयंकर कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. महिलेवर या श्वानाने आधी घरात हल्ला केला. त्यानंतर त्याच्यापासून आपला जीव वाचवण्यासाठी ती लिफ्टमध्ये गेली तर तिथंही या कुत्र्याने तिला ओरबडलं. ती रक्ताने माखली. कुत्र्याच्या या हल्ल्याचं संपूर्ण दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. ज्याचा हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. कोलंबियात (Colombia) राहणारी 25 वर्षांची ही महिला. महिलेने सांगितलं की ती घरात बुटांची लेस बांधत होती. तेव्हा तिचा चार वर्षांचा पिटबुल तिथं आला आणि तो हाताला चावला. महिलेला असह्य वेदना झाल्या ती तिथंच बसली. पण तिचा श्वान त्यावरच थांबला नाही. तो पुन्हा तिच्यावर हल्ला करतच राहिला. हे वाचा – VIDEO – माणसं फक्त तमाशा पाहत राहिली; अखेर एका गाईनेच श्वानाला हैवानाच्या तावडीतून सोडवलं बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावर ही महिला एकटी राहत होती. जर ती घरात राहिली तर पिटबुल आपल्याला खाऊन टाकेल याची कल्पना तिला आली त्यामुळे ती आधी घरातून बाहेर पडली आणि लिफ्टमध्ये गेली. पण तिथंही श्वानाने तिचा पिच्छा सोडला नाही. तोही तिच्या मागोमाग लिफ्टमध्ये घुसला आणि तिच्यावर हल्ला करत राहिला.

Meu Deus s na Colômbia está mulher sofre um ataque de Pit Bull! pic.twitter.com/rdmpM5eNDV

— Margoberndpin🇧🇷🇧🇷🇧🇷 (@Margo06971686) March 20, 2022

@Margo06971686 ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता महिलेला श्वान कशापद्धतीने लचके तोडतो आहे. महिला रक्ताने माखली होती. प्रतिकार करून करून थकली होती. अखेर लिफ्टचा दरवाजा उघडल्यानंतर महिलेला श्वानापासून सोडवण्यात आलं. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यत आलं. ती गंभीररित्या जखमी झाली आहे. तिची सर्जरी करण्यात आली आहे. हे वाचा – म्हशीपासून आपला जीव वाचवण्यासाठी जंगलाचा राजाही पळत सुटला; सिंहाचा कधीच पाहिला नसेल असा VIDEO आपला श्वान खूप शांत होता, तो असं काही करेल याचा स्वप्नातही विचार केला नव्हता असं ही महिला म्हणाली. आता या श्वानाला दहा दिवस देखरेखीत ठेवण्यात आलं आहे, त्याच्या स्वभाव मॉनिटर केला जाणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.