रशियानं Instagram आणि Facebook वर घातली बंदी, सांगितलं हे कारण

मॉस्को, 22 मार्च : गेल्या एका महिन्यापासून रशिया युक्रेनसोबत युद्ध करत आहे. रशियाच्या या लष्करी कारवाईला (Russia Ukraine War) अनेक देशांनी विरोध केला आणि त्यावर विविध निर्बंध लादले. यामध्ये आर्थिक निर्बंधांचाही समावेश आहे. त्याच वेळी, गुगल (Google) आणि फेसबुक (Facebook) सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने देखील रशियावर निर्बंध जाहीर केले आहेत. दरम्यान, रशियातील एका न्यायालयानं देशातील (Instagram) आणि फेसबुकवर पूर्ण बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. मेटा (meta) ही कंपनी उग्रवादाला प्रोत्साहन देणारी असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. रशियन लोकांमध्ये फेसबुक आणि इन्स्टाग्रामचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याचं मॉस्को येथील न्यायालयानं म्हटलं आहे. हे दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उग्रवादाशी संबंधित क्रियाकलापांना प्रोत्साहन देत आहेत. मात्र, मेटाच्या व्हॉट्सअॅप मेसेंजरवर कोणतेही निर्बंध नसल्याचं म्हटलं आहे. कारण ते संज्ञापनाचं (communication) माध्यम आहे. माहितीचे स्रोत नाहीत. उग्रवादाशी संबंधित कायद्यानुसार ही बंदी घालण्याचा निर्णय न्यायालयानं घेतला आहे. हे वाचा – आज भारताला सलाम करतो..! पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही आले ताळ्यावर, भरसभेत म्हणाले..
मॉस्कोमध्ये सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान, रशियाच्या FSB सुरक्षा सेवेने मेटा कंपनीवर रशियन लोकांबद्दल द्वेष निर्माण करणारे पर्यायी वास्तव निर्माण केल्याचा आरोप केला. ते म्हणतात की मेटा संघटनेच्या कारवाया रशिया आणि त्याच्या सैन्याविरुद्ध आहेत.
एफएसबीचे प्रतिनिधी कोवाल्स्की यांनी सोमवारी न्यायालयात सांगितलं की व्यक्ती आणि कायदेशीर संस्थांद्वारे मेटा उत्पादनांचा वापर अतिरेकी किंवा उग्रवादी क्रियाकलापांमध्ये सहभाग म्हणून केला जाऊ नये. Meta च्या सेवा वापरण्यासाठी व्यक्तींना जबाबदार धरले जाणार नाही. हे वाचा – Video: युद्धामुळे रशियातील सामान्य माणसाची हालत बिकट? सुपर मार्केटमध्ये साखरेसाठी कसे भांडताहेत पाहा लोक
दरम्यान, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर जाहिराती विकत घेणाऱ्या रशियन आणि परदेशी कंपन्यांवर दहशतवादी संघटनेला निधी पुरवण्याशी संबंधित रशियन कायद्यानुसार कारवाई केली जाऊ शकते की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. रशियन प्रसारमाध्यमांच्या मते, मेटाच्या वकील व्हिक्टोरिया शगीना यांनी न्यायालयाला सांगितलं की कंपनी कोणत्याही प्रकारच्या रुसोफोबियाला (russophobia – रशियाविरोधात वातावरणनिर्मिती) विरोध करते आणि अतिरेकी कारवाया करत नाही.
Published by:Digital Desk
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.