Home » आंतरराष्ट्रीय » लोन फेडण्यासाठी सरोगेट आई झाली, सर्जरी केल्यानंतर कर्करोगाचं निदान; भयंकर अवस्था

लोन फेडण्यासाठी सरोगेट आई झाली, सर्जरी केल्यानंतर कर्करोगाचं निदान; भयंकर अवस्था

लोन-फेडण्यासाठी-सरोगेट-आई-झाली,-सर्जरी-केल्यानंतर-कर्करोगाचं-निदान;-भयंकर-अवस्था

नवी दिल्ली, 22 मार्च : यूक्रेन हा देश जगातील सर्वात मोठा सरोगसी मार्केट आहे. युक्रेनमध्ये सरोगसीला कायदेशीर मान्यता आहे. यूक्रेनमध्ये सरोगेट बेबीसाठी एक दाम्पत्य तब्बल 45,000 डॉलर खर्च करतात. म्हणजे तब्बल 34 लाख. तर अमेरिकेत हा खर्च दुप्पटीने जास्त आहे. तब्बल 1,30,000 डॉलर म्हणजे 1 कोटींहून जास्त. आरोग्य आणि सुरक्षाही धोक्यात… मात्र या मुलांना 9 महिन्यांपर्यंत आपल्या पोटात वाढवून आयुष्य देणाऱ्या सरोगेट आईला अवघे 15000 डॉलर्स दिले जातात. म्हणजे 11 लाख. युद्धाची परिस्थिती नसतानाही सेवा देणाऱ्या कंपन्या या महिलांना प्राण्यांपेक्षाही वाईट स्थितीत ठेवतात. 2-2 सरोगेट मातांना एका बेडवर ठेवले जाते. केंद्रांवर स्वच्छतेची फारशी काळजी घेतली जात नाही. पैशांसाठी सरोगेट आई होणारी एलीनाची कहाणी अत्यंत हृदयस्पर्शी आहे. आपल्या मुलांची शाळेची फी भरण्यासाठी एलीनाने 2016 मध्ये सरोगेट आई होण्याचा निर्णय घेतला. एलीनाला या जाहिरातीच्या माध्यमातून BioTexCom बद्दल कळालं. ही युक्रेनमधील सर्वात मोठी सरोगसी कंपनी आहे. युक्रेनमध्ये सरोगसीच्या माध्यमातून जन्म घेणाऱ्या एकूण मुलांमध्ये तब्बल अर्धे BioTexCom मधून जन्म घेतात. 2017 मध्ये, एलिना रोमानियातील एका जोडप्याची सरोगेट मदर बनली. परंतु अलिनाला गरोदरपणात त्रासाला सामोरे जावे लागले. कंपनीने अलिनाला एका छोट्या अपार्टमेंटमध्ये ठेवले. जिथे एलिनाला कंपनीच्या इतर सरोगेट मातांसोबत एकाच बेडवर झोपावे लागले. त्यातले बरेचसे गावातील किंवा लहान शहरांतील होते. ना जेवणाची योग्य व्यवस्था होती ना राहण्याची योग्य व्यवस्था. त्यांना प्राण्यांप्रमाणे ठेवले होते, असं एलिनाने सांगितलं. डिलिव्हरीसाठी तिला कीवमध्ये एका सरकारी रुग्णालयात भरती करण्यात आलं. या रुग्णालयाची अवस्था तर अधिकच खराब होती. येथे तर पाण्याचीही सुविधा नव्हती.बाळाच्या जन्मानंतर एलिनाची प्रकृती खूप खालावली. गर्भ नाळ पोटात राहिल्यामुळे तिला खूप रक्तस्त्राव होत होता. ती ICU मध्ये भरती होती. मात्र कंपनीने याकडे फारसं लक्ष दिलं नाही. त्यांना मूल मिळालं होतं. त्यामुळे त्यांनी एलिनाची पर्वा केली नाही. हे ही वाचा-तीन आरोपी 3 वर्षांपासून होते फरार; एकाच रात्रीत झाला गेम ओव्हर, नांदेडातील घटना कंपनीने शस्त्रक्रिया केली, आणि कर्करोगाची लागण… बँकेचं लोन फेडण्यासाठी शुलजेंस्काने बँकेचं लोन फेडण्यासाठी इतालवी दाम्पत्यासाठी आई होण्याचा निर्णय घेतला. प्रेग्नेंन्सी टेस्टमध्ये कळालं की, तिच्या गर्भात चार भ्रृण आहेत. मात्र दाम्पत्याला एकच मूल हवं होतं. त्यामुळे कंपनीने शस्त्रक्रिया करून तीन भृण पाडले. यानंतर तिला कर्करोगाची लागण झाली. ही सर्जरी करण्यापूर्वी तिला विचारण्यातही आलं नव्हतं. परिणामी तिचं बँक लोन पहिल्यापेक्षा अधिक वाढलं.

Published by:Meenal Gangurde

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags: Ukraine news

Leave a Reply

Your email address will not be published.

You may have missed