Home » आंतरराष्ट्रीय » 200 जणांकडून इस्कॉन मंदिरावर हल्ला, तोडफोडीसह लूटमार; अनेक जण जखमी

200 जणांकडून इस्कॉन मंदिरावर हल्ला, तोडफोडीसह लूटमार; अनेक जण जखमी

200-जणांकडून-इस्कॉन-मंदिरावर-हल्ला,-तोडफोडीसह-लूटमार;-अनेक-जण-जखमी

ढाका, 18 मार्च: बांगलादेशची (Bangladesh) राजधानी ढाका (Dhaka) येथील इस्कॉन राधाकांता (ISKCON Radhakanta) मंदिराची तोडफोड आणि लुटमार (vandalized and looted) करण्यात आली आहे. वृत्तानुसार 200 हून अधिक लोकांनी गुरुवारी ढाका येथील वारी येथील 222 लाल मोहन साहा स्ट्रीट येथील इस्कॉन राधाकांता मंदिरावर हल्ला केला. या हल्ल्यात सुमंत्र चंद्र श्रवण, निहार हलदर, राजीव भद्र यांच्यासह अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुरुवारी संध्याकाळी सातच्या सुमारास मंदिरावर हल्ला झाला. हल्ल्यादरम्यान जमावानं मंदिरात ठेवलेले अनेक मौल्यवान साहित्य लुटून तेथून निघून गेले. हल्लेखोरांनी मंदिराची तोडफोड केली आहे. मंदिराच्या भिंतींना तडे गेले आहेत. समोर आलेल्या फोटोमध्ये मंदिरात मोठ्या प्रमाणात तोडफोड झाल्याचं दिसत आहे. घटनास्थळी अजूनही तणाव आहे. सध्या मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 200 लोकांच्या जमावाने मंदिरात घुसून तोडफोड केली. यासोबतच तेथे लूटमारही करण्यात आली आहे. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे. इस्कॉनचा भाग असलेल्या ढाक्यातील राधाकांता मंदिरात हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. बांगलादेशातील हिंदू समुदायासाठी काम करणाऱ्या एका संघटनेनं आपल्या ट्विटर अकाऊंटवर या हल्ल्याची काही फोटो आणि माहिती शेअर केली आहे. मंदिराची भिंत पाडण्यात आल्याचं या फोटोंमध्ये दिसत आहे. यासोबतच तेथून सामानही लुटण्यात आलं आहे. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी पोलिसांनाही या हल्ल्याची माहिती दिली. मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याची माहिती देण्यात आली आहे. याआधीही बांगलादेशात मंदिरांना लक्ष्य करण्यात आलं आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये चौमुनी येथील इस्कॉनच्या श्री श्री राधाकृष्ण गौरा नित्यानंद ज्यू मंदिरावरही जमावाने हल्ला करून तोडफोड केली होती. या हल्ल्यात 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचीही माहिती समोर आली होती.यासोबतच इतर अनेक शहरांमध्ये मंदिरांवरही हल्ले होते.

Published by:Maharashtra Maza News

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags: Bangladesh

Leave a Reply

Your email address will not be published.