Home » आंतरराष्ट्रीय » रशियाचे 'किंझल' मिसाईल हिरोशिमावर पडलेल्या अणुबॉम्बपेक्षा 33 पट अधिक शक्तिशाली

रशियाचे 'किंझल' मिसाईल हिरोशिमावर पडलेल्या अणुबॉम्बपेक्षा 33 पट अधिक शक्तिशाली

रशियाचे-'किंझल'-मिसाईल-हिरोशिमावर-पडलेल्या-अणुबॉम्बपेक्षा-33-पट-अधिक-शक्तिशाली

नवी दिल्ली, 20 मार्च : रशिया युक्रेन युद्ध दिवसेंदिवस गंभीर रुप धारण करताना दिसत आहे. रशियाने आता घातक शस्त्रांचा वापर युद्धात सुरू केला आहे. ध्वनीच्या वेगापेक्षा 10 पट वेगाने कोणत्याही हवाई संरक्षण यंत्रणेला सहज पराभूत करण्याची क्षमता असलेले हायपरसॉनिक क्षेपणास्त्र ‘किंझल’चा (Kinzhal Hypersonic Missiles) वापर युक्रेनविरुद्ध युद्धात (Ukraine-Russia War) केल्याचे रशियाने पहिल्यांदाच मान्य केलं आहे. रशियाचे म्हणणे आहे की त्यांनी पश्चिम युक्रेनमधील शस्त्रास्त्रांचा साठा नष्ट करण्यासाठी या क्षेपणास्त्राचा वापर केला. रशियाचे ‘किंझल’ हायपरसॉनिक क्षेपणास्त्र दुसऱ्या महायुद्धात 6 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा शहरावर टाकलेल्या फॅट मॅन बॉम्बपेक्षा (Fat Man Bomb)33 पट अधिक अणुभार वाहून नेऊ शकते. रशिया जेव्हा किंझल क्षेपणास्त्राची चाचणी घेत होता, तेव्हा ते गेम चेंजर असल्याचे बोलले जात होते. किंझल हायपरसॉनिक मिसाईलबद्दल काही तथ्य किंझल हे हवेतून मारा करणारे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र आहे. त्याची रेंज 1500 ते 2000 किमी आहे. ते 480 किलो न्यूक्लियर पेलोड सोबत वाहून नेऊ शकते. किंझल क्षेपणास्त्राचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा 10 पट जास्त आहे, जो प्रक्षेपणानंतर डोळ्यांना दिसत नाही. किंझल म्हणजे मराठी ‘खंजीर’ ज्याला इंग्रजीत ‘डॅगर’ म्हणतात. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मार्च 2018 मध्ये किंझल क्षेपणास्त्राचे अनावरण केल्याचे सांगितले जात आहे. किंझलची संकल्पना इस्कंदर-एम सारख्या जमिनीवरून सोडण्यात येणाऱ्या कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रातून निर्माण झाल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. हजारो सैनिक ठार, 95 विमानं नष्ट आणि अजून बरंच काही; रशियाचे किती झालं नुकसान? प्रक्षेपणानंतर, किंझल ताशी 4900 किमी वेगापर्यंत जाते. त्याचा वेग 12,350 किमी प्रतितास पर्यंत वाढू शकतो. किंझल क्षेपणास्त्राची आक्रमण क्षमता अत्यंत धोकादायक असल्याचे सांगण्यात येत आहे. ते खूप खोलवर धडकू शकते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी किंझल हायपरसॉनिक क्षेपणास्त्राचे वर्णन एक आदर्श शस्त्र केलं आहे. कमी उंचीवर अतिशय वेगाने उड्डाण केल्यामुळे या क्षेपणास्त्रात कोणत्याही हवाई संरक्षण प्रणालीला भेदण्याची क्षमता आहे. हायपरसॉनिक क्षेपणास्त्र विकसित करण्याच्या शर्यतीत रशिया आघाडीवर आहे, त्यानंतर चीन आणि अमेरिकेचा क्रमांक लागतो. इतर अनेक देश हे तंत्रज्ञान विकसित करण्यावर काम करत आहेत. अमेरिकच्या अध्यक्षांचा जिनपिंगना इशारा, रशियाला मदत केल्यास परिणाम भोगावे लागतील किंझल क्षेपणास्त्र कालिनीग्राडमध्ये तैनात करण्यात आले होते. हे पोलंड आणि लिथुआनियाच्या सीमेला लागून असलेले बाल्टिक समुद्राचे क्षेत्र आहे. फेब्रुवारीमध्ये रशिया युक्रेनजवळ आपले सैन्य तैनात करत होता. रशियाने या क्षेपणास्त्राने युक्रेनवर हल्ला केल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, खुद्द रशियानेच किंझल क्षेपणास्त्र डागल्याचा दावा केला आहे. हायपरसोनिक मिसाईल तंत्रज्ञानात भारत आता कुठे उभा आहे? भारत काही वर्षांपासून हायपरसॉनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञानावर काम करत असून सध्या अमेरिका, रशिया आणि चीनच्या मागे आहे. सप्टेंबर 2020 मध्ये, DRDO ने हायपरसोनिक तंत्रज्ञान प्रात्यक्षिक वाहन (HSTDV) ची यशस्वी चाचणी केली आणि त्याच्या हायपरसोनिक एअर-ब्रेथिंग स्क्रॅमजेट तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक केले. अहवालानुसार, भारताने स्वतःचे क्रायोजेनिक इंजिन विकसित केले आहे आणि 23 सेकंदांच्या फ्लाइटमध्ये त्याची चाचणी केली आहे. आता HSTDV वापरून भारत हायपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र विकसित करण्याचा प्रयत्न करेल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हायपरसॉनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दिशेने काम करण्यासाठी शास्त्रज्ञांना आधीच प्रोत्साहन दिले आहे.

Published by:Rahul Punde

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags: Russia Ukraine

Leave a Reply

Your email address will not be published.