Home » आंतरराष्ट्रीय » भारताच्या शेजारील देश आर्थिक संकटात, पेपर खरेदीसाठी पैसे नसल्याने परीक्षा रद्द

भारताच्या शेजारील देश आर्थिक संकटात, पेपर खरेदीसाठी पैसे नसल्याने परीक्षा रद्द

भारताच्या-शेजारील-देश-आर्थिक-संकटात,-पेपर-खरेदीसाठी-पैसे-नसल्याने-परीक्षा-रद्द

श्रीलंका पश्चिम प्रांताच्या शिक्षण विभागाने सांगितले की, देशात परकीय चलन नसल्यामुळे कागद आणि शाई बाहेरून आयात करता येत नाही, त्यामुळे कोणतीही शाळा मुख्याध्यापक परीक्षा घेऊ शकणार नाही.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  कोलंबो, 20 मार्च : भारताच्या शेजारील देश श्रीलंका मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. देशात कागद खरेदी करण्यासाठी डॉलर (परदेशी चलन) नाही. पेपर खरेदी करता न आल्याने देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. परीक्षा कधी होणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बाहेरून कागद खरेदी करण्यासाठी देशाकडे डॉलर नाहीत. सोमवारपासून शालेय विद्यार्थ्यांची परीक्षा होणार होती, मात्र देशात पेपरची तीव्र टंचाई असल्याने परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याचे शिक्षण अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 1948 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर श्रीलंका सर्वात वाईट आर्थिक संकटातून जात आहे. पश्चिम प्रांताच्या शिक्षण विभागाने सांगितले की, देशात परकीय चलन नसल्यामुळे कागद आणि शाई बाहेरून आयात करता येत नाही, त्यामुळे कोणत्याही शाळेत परीक्षा घेणे शक्य होणार नाही. रशियाचे ‘किंझल’ मिसाईल हिरोशिमावर पडलेल्या अणुबॉम्बपेक्षा 33 पट अधिक शक्तिशाली, भारताकडे आहे का? दोन तृतीयांश शालेय विद्यार्थी प्रभावित सरकारी सूत्रांनी EdDTV वेबसाइटच्या बातमीत सांगितले आहे की, सरकारच्या या निर्णयाचा देशातील दोन तृतीयांश विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे. एका अंदाजानुसार, श्रीलंकेत 45 लाख शालेय विद्यार्थी आहेत. श्रीलंकेतील टर्म टेस्ट ही एक प्रकारची अंतिम परीक्षा आहे ज्यामध्ये विद्यार्थी पुढील वर्गात जाऊ शकतो की नाही हे मूल्यांकन प्रक्रियेद्वारे ठरवले जाते. ही वर्षातील शेवटची परीक्षा आहे. श्रीलंकेत परकीय चलनाच्या साठ्याचा इतका तुटवडा निर्माण झाला आहे की अत्यावश्यक आयातीसाठी पैसाही उभारता येत नाही. गेल्या काही दिवसांपासून या आर्थिक संकटामुळे जीवनावश्यक अन्न, इंधन आणि औषधांची आयातही बंद करण्यात आली आहे. या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी श्रीलंकेने विनंती करूनही चीनकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. हजारो सैनिक ठार, 95 विमानं नष्ट आणि अजून बरंच काही; रशियाचे किती झालं नुकसान? या वर्षी 6.9 अब्ज डॉलर भरावे लागतील श्रीलंका प्रचंड विदेशी कर्जाखाली बुडाला आहे. त्यांनी चीनकडून सर्वाधिक कर्ज घेतले आहे. सुमारे 2.2 कोटी डॉलर्सचे रोखीचे संकट लगेचच देशासमोर आहे. अशा परिस्थितीत, सरकारने जाहीर केले की ते IMF कडून आपल्या बिघडलेल्या विदेशी कर्जाचे संकट सोडवण्यासाठी आणि परकीय चलनाचा साठा वाढवण्यासाठी बेल-आउट पॅकेज मागतील. IMF म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या विनंतीवर चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे. यावर्षी, श्रीलंकेवर सुमारे 6.9 अब्ज डॉलर कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी आहे, परंतु फेब्रुवारी अखेरीस, त्यांचा परकीय चलन साठा केवळ 2.3 अब्ज आहे. त्यामुळे श्रीलंकेत इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी परकीय चलनाची तीव्र टंचाई आहे. तेल, अन्न यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंसाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दूध पावडर, साखर, डाळी, तांदूळ यांच्या रेशनिंगसाठीही लाईन आहेत. प्रचंड वीजपुरवठा खंडित झाला आहे.

  Published by:Pravin Wakchoure

  First published:

  मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  Tags: Money, Sri lanka

  Leave a Reply

  Your email address will not be published.