Home » आंतरराष्ट्रीय » धोका कायम..! Omicron नंतरही नवीन व्हेरिएंट येणार, तज्ज्ञांनी दिला सावध इशारा

धोका कायम..! Omicron नंतरही नवीन व्हेरिएंट येणार, तज्ज्ञांनी दिला सावध इशारा

धोका-कायम.!-omicron-नंतरही-नवीन-व्हेरिएंट-येणार,-तज्ज्ञांनी-दिला-सावध-इशारा

कोरोना व्हायरसच्या Omicron व्हेरिएंटमुळे (Omicron Variant) जगातील सर्व देश व्हायरसच्या (Coronavirus Infection) संसर्गाने त्रस्त झाले आहेत.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  वॉशिंग्टन, 16 जानेवारी: कोरोना व्हायरसच्या Omicron व्हेरिएंटमुळे (Omicron Variant) जगातील सर्व देश व्हायरसच्या (Coronavirus Infection) संसर्गाने त्रस्त झाले आहेत. कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सध्या सर्व देश करताना दिसत आहेत. पण याचदरम्यान शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, हा व्हेरिएंट कोरोना व्हायरसचा शेवटचा व्हेरिएंट नसणार आहे. कारण असे व्हेरिएंट भविष्यातही पाहायला मिळू शकतात. सुरुवातीच्या संसर्गामुळे, या व्हायरसला म्यूटेशन (Mutation of Coronavirus) करण्याची संधी मिळेल. लस आणि प्रतिकारशक्ती नैसर्गिकरीत्या मिळाली असूनही हा व्हेरिएंट लोकांना संक्रमित करत आहे. याचा अर्थ हा व्हायरस अधिकाधिक लोकांमध्ये विकसित होऊ शकतो. या तज्ज्ञांनी सांगितले की, पुढील व्हेरिएंट कसा दिसेल किंवा तो महामारीला कसा आकार देईल हे आम्हाला माहित नाही. मात्र ओमायक्रॉनच्या सिक्वेलमुळे सौम्य रोग होईल किंवा सध्याची लस त्यावर कार्य करेल याची शाश्वती नाही. तज्ज्ञांनी कोरोना लसीकरण जलदगतीने सुरू ठेवण्याचे आवाहन केले असून सध्याची लस या साथीच्या रोगाशी लढण्यासाठी प्रभावी असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. झपाट्याने वाढणारा संसर्ग चिंतेचं विषय बोस्टन युनिव्हर्सिटीचे एपिडेमियोलॉजिस्ट लिओनार्डो मार्टिनस यांनी सांगितले की, संसर्ग झपाट्याने पसरत असल्यानं ओमायक्रॉनला अधिक उत्परिवर्तन (Mutation) निर्माण करण्याची संधी मिळेल. ज्यामुळे आणखी व्हेरिएंट्स येण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरच्या मध्यात या व्हेरिएंटचं आगमन झाल्यापासून ते जगभर आगीसारखे पसरलं आहे. संशोधनात असे दिसून आले आहे की, ओमायक्रॉन डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत चौपट गती संक्रमित करते. ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे ब्रेकथ्रू संसर्ग झाला आहे आणि लस घेतलेल्या लोकांना संसर्ग झाला आहे. याशिवाय हा व्हेरिएंट अशा लोकांवर देखील हल्ला करत आहे ज्यांना लसीचे संरक्षण नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, 3 ते 9 जानेवारी दरम्यान जगभरात कोविड-19 चे सुमारे 1.5 कोटी रुग्ण आढळले आहेत, जे मागील आठवड्याच्या तुलनेत 55 टक्के अधिक आहे. U-19 World Cup: टीम इंडियाची विजयी सुरुवात, दक्षिण आफ्रिकेचा 45 धावांनी पराभव जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी एपिडेमियोलॉजिस्ट डॉ स्टुअर्ट कॅम्पबेल म्हणाले की, वारंवार आणि दीर्घकाळ संसर्ग झाल्यामुळे नवीन व्हेरिएंट उद्भवण्याची शक्यता आहे.

  Published by:Maharashtra Maza News

  First published:

  मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  Tags: Corona virus in india, Coronavirus

  1 thought on “धोका कायम..! Omicron नंतरही नवीन व्हेरिएंट येणार, तज्ज्ञांनी दिला सावध इशारा

  Leave a Reply

  Your email address will not be published.