Home » आंतरराष्ट्रीय » तुम्हीही भरभरून Deodorant मारताय? पाहा Nipples वर कसा झाला खतरनाक परिणाम

तुम्हीही भरभरून Deodorant मारताय? पाहा Nipples वर कसा झाला खतरनाक परिणाम

तुम्हीही-भरभरून-deodorant-मारताय?-पाहा-nipples-वर-कसा-झाला-खतरनाक-परिणाम

लंडन, 24 जानेवारी : शरीराला घामाचा दुर्गंध येऊ नये म्हणून डिओडरंट (Deodorant) वापरलं जातं. पण काही लोक शरीरावर इतका डिओडरंट स्प्रे करतात की जणू त्यांनी डिओडरंटनेच अंघोळ केली असावी असं वाटतं. पण इतक्या प्रमाणात डिओडरंट मारणं किती खतरनाक ठरू शकतं, याचंच एक प्रकरण समोर आले. एका तरुणाने आपल्या छातीवर इतकं डिओडरंट मारलं की त्याच्या निप्पलवर (Deodorant spray freeze Nipples ) त्याचा खतरनाक परिणाम झाला. युनिव्हर्सिटी ऑफ लिव्हरपूरमधील एका विद्यार्थ्याने डिओडरंट मारण्याचं चॅलेंज स्वीकारलं. हे चॅलेंज इतकं महागात पडेल याचा विचारही त्याने केला नव्हता. डिओडरंट स्प्रे करण्याच्या चॅलेंजच्या नादात त्याने आपल्या निप्पल्सची वाट लावून घेतली आहे. डेली स्टरच्या रिपोर्टनुसार 19 वर्षांच्या या विद्यार्थ्याने सांगितलं की, त्याच्या मित्रांनी त्याला डिओडरंट आपल्या निप्पल्सवर स्प्रे करण्याचं चॅलेंज दिलं. त्याने ते चॅलेंज स्वीकारलं. चेंजिंग रूममध्ये त्याच्या मित्रांनी त्याचे हात बांधले आणि त्याच्या निप्पलवर डिओडरंट स्प्रे केला. तब्बल 2 कॅन त्यांनी रिकामी केले. हे वाचा – बापरे! काय ही अवस्था; सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्यावर प्रयोग करण्याआधी हा VIDEO पाहा सुरुवातीला त्याला थंड वाटत होतं. पण हळूहळू स्थिती बिघडत गेली.  त्याने आपल्या निप्पलला हात लावला तर त्याला काहीच जाणवत नव्हतं. ते पूर्णपणे सुन्न झाले होते. इतकंच नव्हे तर त्यातून रक्तही येत होतं. अद्यापही त्याच्या निप्पलचा आकार पूर्वस्थितीत आलेला नाही.

Deodorant खरेदी करताना या गोष्टींची खात्री करा

अनेक वेळा आपण फक्त सुगंध पाहून डीओ खरेदी करतो. कदाचित ते अंगावर लावल्यानंतर पित्ती, खाज सुटणे, त्वचा लाल होणे, अशा त्वचेच्या समस्या होऊ शकतात. या समस्यांपासून शरीराला वाचवण्यासाठी आणि पैशाचा अपव्यय टाळण्यासाठी तुम्ही टेस्ट करण्याची सोय असलेल्या दुकानातून डीओ खरेदी करा. खरेदी करण्यापूर्वी, डिओ तुमच्या शरीरावर आणि तुम्ही परिधान केलेल्या कपड्यांवर फवारणी करून घ्या. त्यानंतर दोन दिवस त्याचा परिणाम पाहिल्यानंतरच डिओ विकत घ्यायचा की नाही याचा निर्णय घ्या. विषारी घटक असलेले डिओ खरेदी करणे टाळा डीओच्या बहुतेक पॅकमध्ये त्यांच्यामध्ये असलेल्या घटकांबद्दल माहिती असते, जी काळजीपूर्वक वाचणे महत्त्वाचे आहे. ट्रायक्लोसन, सल्फेट, पीईजी, सिलिकॉन किंवा पॅराबेन्स सारखी विषारी द्रव्ये असलेली डीओ खरेदी करणे टाळा. जेणेकरून तुम्हाला स्कीन अ‌ॅलर्जीसारख्या समस्या होणार नाहीत आणि त्वचा विकारांवर होणारा तुमचा खर्च वाचेल. नैसर्गिक घटक असलेले डीओ निवडा तुमच्या शरीराच्या त्वचेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. यासाठी कोरफड, टी ट्री ऑइल यांसारखे नैसर्गिक घटक असलेले डीओ निवडा. तसेच, अशा ब्रँडचा डीओ निवडा ज्याला टॉक्सिन फ्री, मेड सेफ आणि एन्व्हायर्नमेंट फ्रेंडली असे टॅग किंवा प्रमाणपत्रे आहेत. याबाबत तुम्ही गुगलची मदत घेऊ शकता. कपड्यांवर डाग जेव्हा तुम्ही तुमच्या शरीरावर डीओची चाचणी कराल, तेव्हा त्यादरम्यान तुमच्या कपड्यांवरही डीओची फवारणी करा. हे कपडे दोन-तीन दिवसांनी न धुता एकदा पाहुन घ्या आणि डीओ कपड्यांवर डाग तर सोडत नाहीत ना ते पहा. यामुळे तुमचे महागडे कपडे खराब होण्यापासून वाचतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.