Covid-19 लसीकरण विरोधी मोहिमेत सहभागी असलेल्या प्रसिद्ध गायिकेचा Corona मुळे मृत

नवी दिल्ली, 20 जानेवारी: एका प्रसिद्ध गायिकेचा कोरोनामुळे (corona) मृत्यू झाला आहे. चेक गणराज्य येथील प्रसिद्ध गायिका हाना होरका (hana horka) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. 57 व्या हाना होरका यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. धक्कादायक म्हणजे गायिका हाना यांनी कोरोनाची लस घेतली नव्हती. सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी त्यांनी एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये प्रकृती ठिक असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. चेक गणराज्य येथील प्रसिद्ध गायिका हाना होरका या असोनेंस बँडच्या गायिका होत्या. हे वाचा: कोरोना लसीपासून तयार झालेली प्रतिकारशक्ती किती काळ टिकते? संशोधनातून मोठा खुलासा हाना यांना एक मुलगा असून त्यानं कोरोनाची लस घेतली होती. तसंच त्यांच्या पतीनं देखील कोरोनाची लस घेतली होती. हाना यांचा मुलगा रेकनं एका रेडिओ शोमध्ये सांगितलं की, त्याची आई हाना होरका यांनी कोरोनाची लस घेतली नाही आहे. तसंच मला आणि माझ्या वडिलांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी आई आमच्यासोबतच राहत होती. त्यामुळे तिलाही कोरोनाची लागण झाली. हाना या लसीकरण विरोधी मोहिमेत सहभागी होत्या. त्यांच्याकडे हेल्थ पास होता. त्यानंतर हाना यांच्या कुटुंबानं दिलेल्या माहितीनुसार, हेल्थ पास ज्यांच्याकडे असतो. त्यांना सिनेमागृहात तसंच स्टिम बाथ सेंटर येथे जाण्याची परवानगी मिळते. चेक येथे बार, कॅफे आणि सिनेमागृहांमध्ये लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश मिळतो. हे वाचा: यावर्षी 2022 मध्ये दूर होणार कोरोनाचं सावट? WHO ने दिले महत्त्वाचे संकेत हाना होरका यांचा मुलगा रेक यांनं लसीकरण विरोधी आंदोलन करणाऱ्या लोक हे त्याच्या आईच्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. त्या लसीकरणविरोधी आंदोलन करणाऱ्या लोकांनी हाना यांना लस घेण्यापासून थांबवलं होतं, असंही रेकनं सांगितलं आहे.
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona vaccine, Sanjeevani
cC6TtLr9NP
NnkW9wYprg
sTAp79b2rz
BJnz4MgYLV
e3DCBy49GY
mGjf9Z8gP7
r47hFxRtyv
kHN6bKwC3s
MvJc3rjCsU
FcqCJk7sHa