Home » आंतरराष्ट्रीय » इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष: भारतीय नित्शा इस्रायलच्या सैन्यात गाजवतीये पराक्रम

इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष: भारतीय नित्शा इस्रायलच्या सैन्यात गाजवतीये पराक्रम

इस्रायल-पॅलेस्टाईन-संघर्ष:-भारतीय-नित्शा-इस्रायलच्या-सैन्यात-गाजवतीये-पराक्रम

युद्धात इस्रायलच्या सैन्याचा भाग असलेल्या अवघ्या 20 वर्षांच्या नित्शा मुलियाशा (Nitsha Muliyasha) या तरुणीच्या नावाची विशेष चर्चा होत आहे. 20 वर्षांची नित्शा मूळची गुजराती आहे आणि इस्रायल डिफेन्स फोर्सेसच्या (Israel Defence Forces) टीममध्ये सहभागी आहे.

  • Maharashtra Maza News
  • Last Updated: Jun 18, 2021 03:23 PM IST

नवी दिल्ली 18 जून : गेल्या महिन्यात हमास (Hamas) आणि इस्रायल (Israel) यांच्यामध्ये 11 दिवस जोरदार संघर्ष सुरू होता. हमासकडून झालेल्या हल्ल्यांना इस्रायलच्या सैन्याने चोख प्रत्युत्तर दिलं. त्यांच्यातला संघर्ष चिघळल्यामुळे युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती; मात्र नंतर 11 दिवसांनी अखेर शस्त्रसंधी झाली आणि हल्ले थांबले. मात्र ही शांतता जेमतेम महिनाभर टिकली. पॅलेस्टाईनच्या (Palestine) एन्क्लेव्हमधून इस्रायलच्या सीमावर्ती भागांत आग लावणारे फुगे सोडण्यात आले. त्यानंतर मंगळवारी (15 जून) रात्री इस्रायलने गाझा पट्टीतल्या हमासच्या तळांवर हवाई हल्ले केले. पुन्हा संघर्षाला तोंड फुटल्यामुळे युद्धबंदी (Ceasefire) संपुष्टात आली आहे.

या युद्धात इस्रायलच्या सैन्याचा भाग असलेल्या अवघ्या 20 वर्षांच्या नित्शा मुलियाशा (Nitsha Muliyasha) या तरुणीच्या नावाची विशेष चर्चा होत आहे. 20 वर्षांची नित्शा मूळची गुजराती आहे आणि इस्रायल डिफेन्स फोर्सेसच्या (Israel Defence Forces) टीममध्ये सहभागी आहे. गाझा पट्टीत (Gaza) मंगळवारी पुन्हा हल्ले सुरू करण्यात तिची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. ‘अहमदाबाद मिरर’च्या हवाल्याने ‘आज तक डॉट इन’ने नित्शाबद्दलचं वृत्त दिलं आहे.

राजकोटमधल्या (Rajkot) मनावदार तालुक्यातलं कोठाडी हे नित्शाचं मूळ गाव. सध्या ती इस्रायलच्या तेल अवीव शहरात राहत असून, इस्रायलच्या सैन्यात भरती होणारी ती पहिली गुजराती मुलगी आहे. इस्रायलच्या शिक्षणव्यवस्थेमुळेच आपली मुलगी आज सैन्यात पराक्रम दाखवते आहे, असं नित्शाचे वडील जीवाभाई सांगतात.

‘बाबा का ढाबा’ चालवणाऱ्या कांता प्रसाद यांचा आत्महत्येचा प्रयत्न

इस्रायलमध्ये शालेय शिक्षण घेत असतानाच नित्शाला इस्रायलच्या सैन्याची परीक्षा देण्याची संधी मिळाली. त्या परीक्षेची चांगल्या प्रकारे तयारी करण्यासाठी आवश्यक ते शिक्षण आणि सुविधा तिला मिळाल्या. त्यानंतर तिची सैन्यात निवड झाली आहे.

इस्रायलच्या सैन्यासोबत नित्शाचा 2.4 वर्षांचा करार झाला आहे. तेवढ्या कालावधीत तिला सैनिक म्हणून जबाबदारी निभावणं आवश्यक आहे. त्यानंतर तिच्याशी पाच किंवा 10 वर्षांचा शैक्षणिक करार केला जाणार आहे. त्याअंतर्गत तिला तिच्या योग्यतेनुसार इंजिनीअरिंग, मेडिकल किंवा आपल्या आवडीचं अन्य शिक्षण घेता येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे तिच्या या उच्च शिक्षणाचा सगळा खर्च सैन्याकडून केला जाणार आहे. आपल्या मुलीच्या यशाबद्दल ही माहिती देताना जीवाभाईंचा ऊर भरून आला नसता तरच नवल. आपल्याला तिचा अभिमान असल्याचं आणि तिची खूप आठवण येत असल्याचं ते सांगतात.

कायच्या काय! आता पुरुषही देऊ शकणार बाळाला जन्म; वैज्ञानिकांचं भलतंच संशोधन

नित्शा सध्या युद्धात महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहे. तिच्या सैन्यविषयक प्रशिक्षण काळात तिला अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर आणि युद्धाच्या आधुनिक पद्धतीचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे. त्या प्रशिक्षणाचा ती चांगला उपयोग करून घेत आहे. गेली दोन वर्षं नित्शा लेबॅनॉन, सीरिया, जॉर्डन आणि इजिप्त या देशांच्या सीमेवर आपली जबाबदारी निभावत आहे. सध्या ती गश डान येथे तैनात असून, हमासच्या हल्ल्यावर प्रतिहल्ला करण्याचं इस्रायली सैन्याचं काम तिथून सुरू आहे.

Published by: Kiran Pharate

First published: June 18, 2021, 3:23 PM IST

Leave a Reply

Your email address will not be published.

You may have missed