Home » Uncategorized » बाबो..! 'या' देशात मास्क आणि लसीकरणाची आवश्यकता नाही, सरकारनेच घेतला निर्णय

बाबो..! 'या' देशात मास्क आणि लसीकरणाची आवश्यकता नाही, सरकारनेच घेतला निर्णय

बाबो.!-'या'-देशात-मास्क-आणि-लसीकरणाची-आवश्यकता-नाही,-सरकारनेच-घेतला-निर्णय

इटली, 15 जानेवारी: एकीकडे कोरोना व्हायरसनं (Corona Virus) पुन्हा एकदा जगभर थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. मात्र दुसरीकडे युरोपियन देशात (European country) कोरोना संदर्भात वेगळाच निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क तसंच लसीकरण महत्त्वाचं आहे. मात्र या देशात मास्क आणि लसीकरणातूनच नागरिकांची सुटका केली आहे. युरोपमधील देशांमध्ये मास्क आणि लसींची (Masks and Vaccines) आवश्यकता हटवण्यात येत आहे.स्पेन सरकारने कोरोनाला सामान्य फ्लू मानले आहे. यासोबतच लोकांना सोबत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महामारी संपण्याच्या मार्गावर? केवळ मास्कच नाही, तर तिथली सरकार कोरोना लसीची आवश्यकता देखील हटवण्याची शक्यता आहे. सरकारचा विश्वास आहे की, कोरोनाचे केवळ ओमायक्रॉन व्हेरिएंट महामारीला शेवटच्या उंबरठ्यावर घेऊन जाईल आणि ही प्रक्रिया सुरू झाली आहे. यूकेचे शिक्षण सचिव म्हणाले की, यूके आता साथीच्या रोगापासून स्थानिक पातळीवर जात आहे. हेही वाचा-  नाशिकच्या जवानाला सीमेवर वीरमरण, मकरसंक्रांतीच्या दिवशी गावावर कोसळला दुखाचा डोंगर! तज्ज्ञांच्या मते, ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झाल्यास रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता खूपच कमी आहे. यासोबतच मृतांचा आकडाही कमी नोंदवला जात आहे. अशा परिस्थितीत स्पेनचे पंतप्रधान प्रेडो सांचेज यांनी साथीच्या काळात लादलेले निर्बंध संपवून सामान्य जीवनात परतण्याचा निर्णय घेतला आहे. आयर्लंडमध्ये लसीकरणाची आवश्यकता नाही ते म्हणाले की, आता ते महामारीच्या समाप्तीच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात गुंतले आहेत. मात्र युरोपची सरकारे कदाचित वेगवेगळ्या पॅरामीटर्सवर त्याचे तुलना करत आहेत. दुसरीकडे, आयर्लंडमध्ये वाढत्या कोरोना प्रकरणांना न जुमानता, एक स्वैच्छिक लसीकरण प्रणाली तयार केली जात आहे. सरकारला आता लसीकरणाच्या बाबतीत स्वतःहून निर्णय घेण्याचा अधिकार लोकांना द्यायचा आहे. याशिवाय अनेक देशांनी क्वारंटाइन कालावधी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच अत्यावश्यक सेवांवर कोणतेही बंधन घालण्यात आलेले नाही. चेक रिपब्लिकनं अलीकडेच आयसोलेशन कालावधी दोन आठवड्यांवरून केवळ 5 दिवसांवर आणला आहे. येत्या काही दिवसांत इतर युरोपीय देशांनीही आपले निर्बंध शिथिल केले तर गेल्या वर्षीसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, डेन्मार्कमध्ये देखील निर्बंध हटविण्यात आले आहेत आणि मास्क आवश्यक मानले जात नाहीत. नेदरलँड सरकारनेही असाच निर्णय घेतला असून तेथे मास्क घालणे आता बंधनकारक नाही. हेही वाचा-  Good News..! औषध निर्मितीसंदर्भात मोदी सरकारचा जबरदस्त प्लान  दरम्यान, WHO ने Omicron बाबत इशारा दिला आहे. संघटनेने म्हटले आहे की, जरी डेल्टा व्हेरिएंटपेक्षा ओमायक्रॉनमध्ये हा रोग कमी गंभीर असल्याची काही माहिती आहे. मात्र हा सौम्य आजार नाही कारण ओमायक्रॉनमुळे ही लोकांना रुग्णालयात दाखल केलं जात आहे.

Published by:Maharashtra Maza News

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags: Coronavirus, Spain

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *