Home » Uncategorized » रशियाची अमेरिका आणि NATO ला Final Warning, एका आठवड्यात उत्तर द्या अन्यथा…

रशियाची अमेरिका आणि NATO ला Final Warning, एका आठवड्यात उत्तर द्या अन्यथा…

रशियाची-अमेरिका-आणि-nato-ला-final-warning,-एका-आठवड्यात-उत्तर-द्या-अन्यथा…

मॉस्को, 14 जानेवारी: युक्रेनमध्ये (Ukraine) नाटोकडून (Nato) हस्तक्षेप (Interfere) होणार नाही, अशी लेखी कबुली (Written agreement) अमेरिका आणि नाटोनं (US and Nato) द्यावी, अशी मागणी रशियानं (Russia) केली आहे. या मागणीबाबत सध्या मौन बाळगून असलेल्या अमेरिका आणि नाटोनं एका आठवड्यात आपली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरं जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा रशियानं दिला आहे. या इशाऱ्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर वातावरण चांगलंच तापलं असून अमेरिकेच्या उत्तराकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.  काय आहे प्रकरण? रशियाचं शेजारी राष्ट्र असणाऱ्या युक्रेशचा युरोपातील अनेक देशांसोबत संबंध आहे. विशेषतः बेलारूस, पोलंड आणि रोमानिया या देशांची आणि युक्रेनची सीमा कॉमन आहे. त्यामुळे या देशांच्या माध्यमातून युरोपीय शक्ती युक्रेनवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा रशियानं केला आहे. त्यासाठी युक्रेनचा समावेश नाटो देशांच्या यादीत कऱण्यास रशियाचा तीव्र विरोध आहे. मात्र अमेरिकेनं रशियाच्या दबावाला नाटोनं बळी पडू नये, अशी भूमिका घेतली आहे.  रशियाचं सैन्य सीमेवर जर नाटोचं सैन्य युक्रेनचा वापर करून रशियासाठी धोका निर्माण करू पाहत असेल, तर खबरदारीचा उपाय म्हणून अगोदर आम्ही सैन्याची हालचाल केली असल्याचं रशियानं म्हटलं आहे. रशियानं गेल्या काही महिन्यांपासून आपलं सैन्य युक्रेनच्या सीमेवर हलवलं असून गेल्या 24 तासांत अतिरिक्त 1 लाख सैनिक युक्रेन सीमेवर दाखल करण्यात आले आहेत.  धीर सुटत चाललाय आम्ही अनंत काळापर्यंत अमेरिका आणि नाटोच्या उत्तराची वाट पाहत थांबू शकत नाही, असं रशियाचे परराष्ट्रमंत्री सेगी लारोव्ह यांनी म्हटलं आहे. आमच्या सहनशक्तीलाही मर्यादा असून त्याची परीक्षा पाश्चिमात्य देशांनी पाहू नये, असा इशारा त्यांनी दिला आहे. अमेरिका आणि नाटोनं युक्रेनबाबतची त्यांची भूमिका लेखी स्वरूपात द्यावी, अशी मागणी रशियानं केली आहे.  हे वाचा –

अमेरिकेच्या भूमिकेकडे लक्ष अमेरिकेनं रशियाच्या मागणीवर अद्याप कुठलाही प्रतिसाद नोंदवलेला नाही. मात्र रशियाने नाटोचं निमित्त करून युक्रेनमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, तर कडक निर्बंध लादण्याचा इशारा दिला आहे. या परिस्थितीमुळे सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून तो निवळणार की आणखी वाढणार हे पुढच्या आठवडाभरात स्पष्ट होणार आहे. 

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.