Home » Uncategorized » विश्वास बसणार नाही! असे फोटो विकून तरुण झाला मालामाल; 5 दिवसांतच कमावले कोट्यवधी

विश्वास बसणार नाही! असे फोटो विकून तरुण झाला मालामाल; 5 दिवसांतच कमावले कोट्यवधी

विश्वास-बसणार-नाही!-असे-फोटो-विकून-तरुण-झाला-मालामाल;-5-दिवसांतच-कमावले-कोट्यवधी

क्वालालंपूर, 14 जानेवारी : फोटो विकून पैसे कमावणं तसं काही नवं नाही. हल्ली बरेच लोक सोशल मीडिया, जाहिरात यासाठी फोटोशूट करून पैसे कमावतात. विशेषतः सुंदर दिसणाऱ्या महिला, सेलिब्रिटी किंवा अडल्ट वेबसाईटवर काम करणाऱे अडल्ट स्टार यांच्या फोटोला चांगली मागणी असते. शिवाय हँडसम पुरुष असेल तर फोटोमार्फत पैसे कमावण्यात तसे तेसुद्धा मागे नसतात (Man becomes millionaire selling selfies) .  पण हा जर फोटो तुम्ही पाहिला तर ना ही सुंदर महिला आहे, ना हँडसम पुरुष. अगदी एक साध्या सिम्पल तरुणाचा हा फोटो. पण तरी या फोटोमुळे या तरुणाने कोट्यवधी रुपये कमावले आहेत  (Man clicked selfies 5 years). दिसायला तसा ठिकठाक पण चेहऱ्यावर कोणतेच हावभाव नाहीत किंवा फोटोतही तसं काही खास नाही (man earn money by selfie) . तरी या फोटोमुळे हा तरुण कोट्यवधी रुपये कमावतो आहे हे सांगून साहजिकच कुणालाही विश्वास बसणार नाहीच (man earn by photo NFT) . उलट धक्काच बसेल. त्यामुळे हा तरुण नेमका कोण आहे किंवा असं या फोटोत नेमकं काय खास आहे, ज्यामुळे याला इतके पैसे मिळत आहेत, या प्रश्नाने तुमच्या डोक्यात घर केलं असेल नाही ना? हे वाचा – वेळीच सावध व्हा! या 5 App ने उडवली झोप; सर्वेक्षणातून समोर आली धक्कादायक बाब या फोटोतील तरुणाचं नाव आहे घोंजाली. तो 22 वर्षांचा असून  मलेशियातील समेरंग सेंट्रल जावामध्ये (Central Java) राहणारा आहे. हे फोटो म्हणजे घोंजालीने काढलेले सेल्फी आहेत. दररोज सकाळी उठून आपला एक सेल्फी घ्यायची हौस त्याला आहे. सकाळी उठलं की कॉम्प्युटरसमोर बसायचं आणि आपला सेल्फी घ्यायचा. 2017 ते 2021  या गेल्या पाच वर्षांत त्याचा असा दिनक्रम ठरलेलाच होता. त्याला एक व्हिडीओ बनवायचा होता.

today sold more than 230+ and until now I don’t understand why you want to buy #NFT photos of me !!!

but i thank you guys for 5 years of effort paid off pic.twitter.com/nHZJnowCMC — Ghozali_Ghozalu (@Ghozali_Ghozalu) January 11, 2022

पण आपला हा विचित्र छंद आपल्याला कोट्याधीश बनवेल याचा विचार घोंजालीने स्वप्नातही केला नव्हता. त्याच्या या फोटोला आता कोट्यवधींचं मूल्य मिळालं आहे. पाच वर्षांनतर त्याचे सेल्फी विकले जात आहेत. हे वाचा – इटलीच्या प्रिन्सला गर्लफ्रेंडनं म्हटलं कंजूष, कोर्टात पोहोचलं प्रकरण त्याने आपले सेल्फी NFT  म्हणजे नॉन फंजीबल टोकन्समध्ये बदलले आहेत. हा ऑनलाईन करन्सीचा एक फॉर्म आहे. लोक घोंजालीचे NFT खरेदी करून आपल्याकडे जमा करत आहेत. यामुळे त्याला पैसे मिळत आहेत.  घोंजालीने 9 जानेवारीला आपले सेल्फी विकायला सुरुवात केली. फक्त 5 दिवसांतच आपले सेल्फी विकून तो कोट्यधीश बनला आहे.

It’s been 3 days and left 331 NFT sold out now because for the next few years I won’t be listing

You can do anything like flipping or whatever but please don’t abuse my photos or my parents will very disappointed to me I believe in you guys so please take care of my photos. pic.twitter.com/oyGGR2Aben — Ghozali_Ghozalu (@Ghozali_Ghozalu) January 12, 2022

रिपोर्टनुसार, घोंजालीच्या सेल्फी विक्रीत सेलेब्सनेही मदत केली आहे. त्याच्या फोटोला इंडोनेशियातील कित्येत सेलिब्रिटींनी प्रमोट केलं होतं.  एक व्हिडीओ बनवायचं म्हणून तो आपले असे फोटो घेत होता. पण त्याने फोटोचे एनएफटी बदलले आणि त्याला असा फायदा झाला. आपल्या सेल्फीमुळे आपल्याला इतके पैसे मिळत आहेत, यावर खुद्द घोंजालीलाही विश्वास बसत नाही आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *