Home » Uncategorized » पाकिस्तानची पहिलीवहिली Security Policy जाहीर, हिंदुत्व हा धोका असल्याचा दावा

पाकिस्तानची पहिलीवहिली Security Policy जाहीर, हिंदुत्व हा धोका असल्याचा दावा

पाकिस्तानची-पहिलीवहिली-security-policy-जाहीर,-हिंदुत्व-हा-धोका-असल्याचा-दावा

इस्लामाबाद, 14 जानेवारी: पाकिस्तानला (Pakistan) स्वातंत्र्य मिळाल्यानंतर (After independence) पहिल्यांदाच (First time) राष्ट्रीय सुरक्षा धोरण (National Security Policy) आखण्यात आलं असून त्याची औपचारिक घोषणा (Formal Announcement) करण्यात आली आहे. पंतप्रधान इम्रान खान (PM Imran Khan) यांनी याची घोषणा केली असून या धोरणात पाकिस्तानच्या आर्थिक हिताचा (Economic priorities) प्राधान्यानं विचार केला जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. भारतातील हिंदुत्व, आक्रमकता आणि गैरसमज पसरवणे हे धोके असल्याचं या पॉलिसीत नमूद करण्यात आल्याची माहिती ‘एक्सप्रेस ट्रिब्यून’ या वृत्तपत्रानं दिली आहे.  काय आहे पॉलिसी? पाकिस्तानचं आतापर्यंतचं धोरण हे पूर्णतः लष्करकेंद्रीत राहिलं आहे. आता मात्र केवळ लष्करी ताकदीच्या पलिकडे जाऊन पाकिस्तानचा आर्थिक विकास आणि सर्वांगिण सुधारणा या दृष्टीनं नवं धोरण आखण्यात आलं आहे. पाकिस्तानला स्वतंत्र होऊन 75 वर्ष होत आली, तरीदेखील एकही सुरक्षा धोरण आतापर्यंत तयार झालं नव्हतं. गेल्या 75 वर्षातील निम्मा काळ हा पाकिस्तानमध्ये लष्करी सत्तेचा होता. त्यामुळे सतत अस्थिर असणारा पाकिस्तान हा आर्थिकदृष्ट्या कमकुवत होत गेल्याचं पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटलं आहे.  भारताकडून धोका परराष्ट्र धोरणाचा विचार करता भारतासोबत सलोख्याचे संबंध ठेवणंच आपल्या हिताचं राहिल, असं पाकिस्ताननं म्हटलं आहे. मात्र भारतातील आक्रमक हिंदुत्व आणि चुकीची माहिती पसरवण्याचे प्रकार या दोन गोष्टी धोकादायक ठरू शकत असल्यामुळे त्यांच्यापासून सावध राहण्याची गरज असल्याचं मतही या धोरणात मांडण्यात आलं आहे.  हे वाचा –

भारताशी पंगा नाही पुढील किमान 100 वर्षं भारतासोबत कुठलाही पंगा घेण्याची पाकिस्तानची इच्छा नसून दोन्ही देशात सौहार्दपूर्ण संबंध राहावेत, असं हे धोरण म्हणतं. काश्मीरचा वादग्रस्त प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न एका बाजूला सुरूच राहतील, मात्र त्यामुळे भारतासोबतच्या व्यापारी आणि सांस्कृतिक संबंधांत अडथळे येऊ नयेत, अशी अपेक्षा असल्याचं या धोरणात स्पष्ट करण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.