Home » आंतरराष्ट्रीय » चीनमध्ये तिसऱ्या मुलाला जन्म दिल्यावर आता सबसिडीसह टॅक्समध्ये सूट!

चीनमध्ये तिसऱ्या मुलाला जन्म दिल्यावर आता सबसिडीसह टॅक्समध्ये सूट!

चीनमध्ये-तिसऱ्या-मुलाला-जन्म-दिल्यावर-आता-सबसिडीसह-टॅक्समध्ये-सूट!

China Population Policy: चीनची लोकसंख्या म्हातारी होत असल्याने आता सरकारने अनेक योजना जाहीर केल्या आहेत. चीनच्या सरकारी शिन्हुआ वृत्तसंस्थेने सोमवारी दिलेल्या वृत्तानुसार, या संदर्भात बीजिंग, सिचुआन आणि जियानशीसह इतर प्रदेशांमध्ये अनेक समर्थनात्मक उपाय जाहीर करण्यात आले आहेत.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated: Dec 8, 2021 07:53 PM IST

  बीजिंग, 8 डिसेंबर : चीन (China) दिवसेंदिवस म्हातारा होत चालला आहे. परिणामी सरकारच्या चिंता वाढत चालल्या आहेत. तरुण लोक लग्न आणि मुलं होण्यापासून दूर जात आहेत. अशा परिस्थितीत चीन सरकारने गर्भधारणा आणि बाळंतपणादरम्यानच्या खर्चावर सबसिडी देणे आणि त्यांच्या तिसऱ्या अपत्यासाठी जोडप्याला कर सूट देण्यासह अनेक योजना जाहीर केल्या आहेत. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशात जन्मदरात झपाट्याने होणारी घट थांबवणे हा या मागचा उद्देश आहे. चीनच्या राष्ट्रीय संसदेने, नॅशनल पीपल्स काँग्रेस (NPC) ने ऑगस्टमध्ये तीन अपत्य धोरणाला औपचारिक मान्यता दिली.

  देशातील वाढत्या लोकसंख्येचे संकट दूर करण्यासाठी हे एक मोठे धोरणात्मक पाऊल आहे. NPC ने सुधारित लोकसंख्या आणि कुटुंब नियोजन कायदा मंजूर केला. यामुळे आता चीनी जोडप्यांना तीन मुलं जन्माला घालण्यास परवानगी मिळाली आहे. मुलांच्या संगोपनाच्या खर्चामुळे चिनी जोडपी अपत्य होऊ देण्यास टाळटाळ करतात. या पार्श्वभूमीवर सरकारने आता पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे.

  सरकारकडून मदत जाहीर

  लोकसंख्या आणि कुटुंब नियोजन कायदा ऑगस्टमध्ये मंजूर झाल्यापासून चीनच्या 20 हून अधिक प्रांतस्तरीय प्रदेशांनी त्यांच्या स्थानिक बाल जन्म नियमांमध्ये सुधारणा केल्या आहेत. चीनच्या सरकारी शिन्हुआ वृत्तसंस्थेने सोमवारी दिलेल्या वृत्तानुसार, या संदर्भात बीजिंग, सिचुआन आणि जियानशीसह इतर प्रदेशांसह अनेक समर्थनात्मक उपाय जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये पितृत्व रजा मंजूर करणे, मातृत्व रजा आणि लग्नासाठी रजा वाढवणे, पितृत्व रजा वाढवणे इत्यादी गोष्टींचा समावेश आहे.

  लोकसंख्या वाढ मंद, तिसरे अपत्य मंजूर

  नॅशनल हेल्थ कमिशनचे अधिकारी यांग वेन्झो यांनी सांगितले की, “गर्भधारणा आणि बाळंतपणाचा खर्च वाटून घेण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे.” जनगणनेत चीनच्या लोकसंख्येच्या वाढीचा वेग मंदावल्याचे दिसून आल्यानंतर चीनला तीन मुले जन्माला घालण्याची परवानगी देण्यात आली.

  India Vs China | एकेकाळी भारतापेक्षा गरीब असलेला चीन जगातील सर्वात श्रीमंत देश कसा झाला?

  2020 मध्ये नवजात मुलांचे प्रमाण 15% कमी झाले

  चीनमध्ये, 2020 साली नवजात अर्भकांचे प्रमाण 15 टक्क्याने कमी झाले. 2020 मध्ये येथे सुमारे 1.03 कोटी मुलांचा जन्म झाला. 2019 मध्ये ही संख्या 1.17 कोटी होती. या समस्येमुळे जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, कारण काम करणाऱ्या लोकांचे वय निवृत्तीच्या जवळ येत आहे. चीन तरुणांची सतत कमी होत चाललेली संख्या आणि झपाट्याने वृद्धत्वामुळे त्रस्त आहे.

  या वर्षी मे महिन्यात चाइल्ड पॉलिसी बदलली

  या वर्षी मे महिन्यात चीनने विवाहित जोडप्यांना जास्तीत जास्त 3 मुले जन्माला घालण्याची परवानगी देऊन जुने कुटुंब नियोजन धोरण काढून टाकण्याची घोषणा केली. देशात 4 वर्षांपासून नवजात बालकांच्या संख्येत झालेली घट पाहून हा नियम आणण्यात आला आहे. यापूर्वी 2016 मध्ये चीनने 1970 पासून येथे सुरू असलेल्या वन चाइल्ड पॉलिसीमध्ये बदल केला होता.

  China birth rate | चीन झपाट्याने म्हातारा होतोय! मुलांना जन्म देण्यास का घाबरतायेत तरुण?

  जन्मदर का कमी होत आहे?

  बीजिंग-आधारित थिंक-टँक सेंटर फॉर चायना अँड ग्लोबलायझेशनचे डेमोग्राफर हुआंग वेनझेंग यांच्या मते, कमी जन्मदरामागे तीन मुख्य कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे मुलांना जन्म देणाऱ्या महिलांची संख्या कमी होणे, दुसरे कारण म्हणजे झपाट्याने होणारे शहरीकरण आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या लोकांची संख्या आणि तिसरे कारण म्हणजे लसीकरणासह कोविड-19 निर्बंध. सध्या चीन जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. 2016 मध्ये सरकारने एक मुल धोरण रद्द केले असूनही, चीनची तरुण लोकसंख्या झपाट्याने कमी होत आहे.

  Published by: Rahul Punde

  First published: December 8, 2021, 7:53 PM IST

  Leave a Reply

  Your email address will not be published.