Home » आंतरराष्ट्रीय » पाठीमागून वेगाने येणारा मृत्यू पाहून पळू लागले लोक; ज्वालामुखी उद्रेकाचा VIDEO

पाठीमागून वेगाने येणारा मृत्यू पाहून पळू लागले लोक; ज्वालामुखी उद्रेकाचा VIDEO

पाठीमागून-वेगाने-येणारा-मृत्यू-पाहून-पळू-लागले-लोक;-ज्वालामुखी-उद्रेकाचा-video

इंडोनेशिया सध्या ज्वालामुखीच्या उद्रेकाशी झुंज देत आहे. इंडोनेशियातील जावा बेटावर असलेल्या सेमेरू येथे ज्वालामुखीचा (Semeru Volcano) उद्रेक झाला आहे.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  नवी दिल्ली 08 डिसेंबर : निसर्ग सामान्यतः मानवाची काळजी घेण्यासाठी ओळखला जातो. माणसांची काळजी घेऊन आईची भूमिका बजावणारा निसर्ग जेव्हा त्याचे विदारक रूप धारण करतो, तेव्हा मात्र निसर्गासमोर कोणाचंही काही चालत नाही. नैसर्गिक आपत्तींपुढे माणूस हतबल होतो. भूकंप असो वा पूर, निसर्गाच्या महाभयंकर रूपासमोर कोणीही काही करू शकत नाही. सध्या अशाच एका नैसर्गिक आपत्तीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे (Volcano Eruption Horrific Video). हेही वाचा – 800 वर्षांपासून निद्रिस्त ज्वालामुखीचा उद्रेक; Photo पाहूनच चुकेल काळजाचा ठोका इंडोनेशिया सध्या ज्वालामुखीच्या उद्रेकाशी झुंज देत आहे. इंडोनेशियातील जावा बेटावर असलेल्या सेमेरू येथे ज्वालामुखीचा (Semeru Volcano) उद्रेक झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारीच येथे ज्वालामुखीचा उद्रेक झाला. त्यातून निघणारी राख चार किलोमीटरपर्यंत पसरली. स्फोट होऊन बरेच दिवस उलटले असले तरी त्यातून राख आणि धूर निघत आहे.

  BREAKING: Large eruption at Indonesia’s Mount Semeru pic.twitter.com/UO78ZekatP

  — BNO News (@BNONews) December 4, 2021

  या स्फोटात 11 हून अधिक गावे उद्ध्वस्त झाली. जावा बेटावर रात्रीसारखे दृश्य दिवसाच दिसू लागले. त्याचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेक व्हिडिओंमध्ये लोक जीव वाचवण्यासाठी धावताना दिसले. मागून भरधाव वेगाने येणाऱ्या राखेपासून वाचण्यासाठी लोक आरडाओरडा करत पळताना दिसले. हेही वाचा – ‘मम्मी… उतार दो…’, Paragliding चा हा नवा मजेशीर VIDEO तुम्ही पाहिलात का? जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो, तेव्हा त्याचा लावा आणि राख याखाली येऊन लोक जळून मरतात. पण याशिवाय ज्वालामुखीचा उद्रेक झाला की दगडांचा पाऊसही पडतो. यामुळे अनेक जण जखमी होतात. असे अनेक भितीदायक व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. या स्फोटात तेथील एक पूलही उद्ध्वस्त झाला. तसेच, जावामधील सर्व विमान सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.

  Published by:Kiran Pharate

  First published:

  Leave a Reply

  Your email address will not be published.

  You may have missed