Home » आंतरराष्ट्रीय » पुरुषांना कंटाळली, चक्क एलिअनच्या प्रेमात पडली; दुसऱ्या डेटची पाहतेय वाट

पुरुषांना कंटाळली, चक्क एलिअनच्या प्रेमात पडली; दुसऱ्या डेटची पाहतेय वाट

पुरुषांना-कंटाळली,-चक्क-एलिअनच्या-प्रेमात-पडली;-दुसऱ्या-डेटची-पाहतेय-वाट

परग्रहावरून आलेल्या एका उडत्या तबकडीने आपलं अपहरण केलं होतं, असा दावा या महिलेने केला.

  • Maharashtra Maza News
  • Last Updated: Jun 23, 2021 10:46 AM IST

ब्रिटन, 23 जून : एलियन्स (Aliens) अर्थात परग्रहावरचे जीव आहेत की नाहीत, याबद्दल कायमच जगभरात चर्चा सुरू असते. तसंच यूएफओ (Unindentified Flying Objects) अर्थात अज्ञात उडत्या तबकड्यांबद्दलचे अनेक दावे-प्रतिदावेही आपण ऐकले-वाचले आहेत. एलियन्सबद्दल वाटणाऱ्या प्रेमाविषयीचं कथानक असलेला ‘कोई मिल गया’ हा सिनेमा काही वर्षांपूर्वी आला होता. या विषयाच्या काही कार्टून फिल्म्सही (Cartoon Films) आहेत. ब्रिटनमधल्या एबी बेला नावाच्या महिलेने मात्र एलियनबद्दल एक आश्चर्यकारक दावा केला आहे. परग्रहावरून आलेल्या एका उडत्या तबकडीने आपलं अपहरण केलं होतं असं तिनं सांगितलं. तसंच अँड्रोमेडा आकाशगंगेतून (Andromeda Galaxy) आलेल्या एका एलियनवर आपलं प्रेम (Woman love with Alien) जडलं आहे, असा दावाही तिने केला आहे.

डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, एबीने सोशल मीडियावर असं लिहिलं होतं, की पृथ्वीवरच्या पुरुषांचा आपल्याला कंटाळा आला आहे. त्यामुळे आता एखाद्या एलियनने आपलं अपहरण करावं, असं आपल्याला वाटतं. योगायोगाने त्यानंतर एबीला रात्री स्वप्नात पांढरा प्रकाश दिसू लागला. एका रात्री तिला स्वप्नात एक आवाज ऐकू आला आणि ‘नेहमीच्या जागेवर वाट पाहा’ असं त्या आवाजाने तिला सांगितलं. तिला ते खरं वाटलं नाही. पण ती दुसऱ्या दिवशी सायंकाळी नेहमीप्रमाणे उघड्या असलेल्या खिडकीच्या शेजारी बसली होती. नंतर ती झोपायला जाणार तेवढ्यात तिला बाहेर एक उडती तबकडी दिसली. त्या तबकडीतून एक चमचमता हिरवा प्रकाश तिला दिसला. तो प्रकाश आपल्याला उडत्या तबकडीपर्यंत घेऊन गेला, असं एबीने सांगितलं.

हे वाचा – अरेच्चा! इथं कपल एकमेकांना I Love You म्हणत नाही; मग प्रेम व्यक्त करतात कसे?

याच महिन्यात आपल्याला एलियनने किडनॅप केलं होतं, असं एबीने सांगितलं. एलियन्स पृथ्वीवरच्या (Earth) पुरुषांपेक्षा खूप चांगले आहेत, असंही तिने सांगितलं. आपल्या प्रियकर एलियनसोबत पुढच्या डेटची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत, असंही एबीने सांगितलं. तिच्या या आश्चर्यकारक दाव्यामुळे सगळेच अचंबित झाले आहेत.

लोकांना खरं वाटणार नाही, म्हणून तिने आपण पाहिलेल्या एलियन्सचं वर्णनही केलं. ‘मला जे एलियन्स भेटले, ते माणसांसारखेच होते. परंतु खूच उंच आणि सडपातळ होते,’ असा दावा तिने केला. एलियन्सनी आपलं अपहरण केलं आणि 20 मिनिटांनी आपल्याला सुरक्षित परत घरी आणून सोडलं, असं एबी सांगते. ‘एलियन पुन्हा कधी येईल, याची मी वाट पाहत आहे. कारण मला त्याच्याबरोबर अँड्रोमेडा आकाशगंगेची सफर करायची आहे,’ असं एबीने सांगितलं आहे.

हे वाचा – अरे बापरे! आयड्रॉपऐवजी डोळ्यात टाकला नेल ग्लू; महिलेची झाली भयंकर अवस्था

एलियनभेटीची ही ताजी कहाणी आहे; पण ही एकमेव कहाणी मात्र नाही. कारण ब्रिटनमधल्याच (Britain) पाउला स्मिथ नावाच्या महिलेने काही आठवड्यांपूर्वीच अशीच एक कहाणी सांगितली होती. तिचंही एलियन्सनी अपहरण केल्याची आठवण तिने सांगितली.

आपण लहान असताना एलियन्सनी आपलं अपहरण केलं होतं. तेव्हापासून अपहरणाचा सिलसिला सुरूच असून, आतापर्यंत 50हून अधिक वेळा एलियन्सनी आपलं अपहरण केल्याचा पाउलाचा दावा आहे. आपलं अपहरण करणारे एलियन्स ज्या तबकडीतून आले, ती तबकडी बूमरँगच्या आकाराची होती आणि तिच्या कडा प्रकाशमान होत्या, असं तिने सांगितलं.

‘पहिल्यांदा तबकडी पाहिल्यावर मी धावण्याचा प्रयत्न केला; परंतु रेतीत माझे पाय अडकत चालले होते. नंतर अंधारच झाला. नंतर काय झालं याची मला कल्पना नाही. माझे कुटुंबीय सांगतात, की तेव्हा मी चार तास गायब झाले होते. तेव्हापासून नंतर अनेकदा असा प्रकार घडला. माझं अपहरण माझ्या घराच्या खिडकीतून, तसंच पलंगावरून होत होतं,’ असं पाउलाने सांगितलं.

हे वाचा – मादीने घातलेली अंडी काही न खाता हा 50 दिवस ठेवतो तोंडात; किंमत तर ऐका माशाची

हे प्रकार खरंच घडले आहेत का, याबद्दल त्या दोन महिलांना आणि एलियन्सनाच काय ते माहिती! पण तोपर्यंत ही अद्भुत सुरम्य फँटसी समजायला हरकत नाही.

Published by: Priya Lad

First published: June 23, 2021, 10:46 AM IST

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *