Home » आंतरराष्ट्रीय » BREAKING : मोस्ट वाँटेड दहशतवादी हाफिज सईदच्या घराजवळ भीषण स्फोट, 2 जण ठार

BREAKING : मोस्ट वाँटेड दहशतवादी हाफिज सईदच्या घराजवळ भीषण स्फोट, 2 जण ठार

breaking-:-मोस्ट-वाँटेड-दहशतवादी-हाफिज-सईदच्या-घराजवळ-भीषण-स्फोट,-2-जण-ठार

मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्यातला मास्टरमाईंड हाफिज सईद (Hafiz Saeed) च्या लाहोर येथील घराबाहेर भीषण स्फोट झाला आहे.

  • Maharashtra Maza News
  • Last Updated: Jun 23, 2021 02:00 PM IST

इस्लामाबाद, 23 जून : मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्यातला मास्टरमाईंड  हाफिज सईद (Hafiz Saeed) च्या लाहोर येथील घराबाहेर भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 10-20 लोकं जखमी झाले आहे. या स्फोटामुळे पाकिस्तानात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जौहर टाउनच्या अकबर चौकात हा स्फोट झाला आहे. घटनास्थळी सुरक्षा पथक दाखल झाले आहे.  CNN-News18 ने दिलेल्या वृत्तानुसार, हाफीज सईद ज्या परिसरात राहत होता, तिथून जवळच एका घरात हा स्फोट झाला आहे. या घरात संशायस्पद स्थितीत अनेक लोक ये जा करत होते. स्फोट झाला तेव्हा हाफीज सईद घरीच होता का, याबद्दल अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

ठाकरे सरकारमध्ये नवा वाद, या निर्णयावर छगन भुजबळ संतापले!

तर पाकिस्तानी चॅनल ARY न्यूजने दिलेल्या माहितीनुसार,  2-3 लोकं किरकोळ जखमी झाले आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. यात 4 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना ICU मध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलीस घटनास्थळावर दाखल झाले असून पंचनामा करत आहे हा स्फोट पाइपलाइन गॅसचा असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

गॅस पाइपालाइन फुटली आणि IED चा स्फोट?

स्थानिक सुरक्षा संस्थेच्या अधिकाऱ्यांनी जोपर्यंत संपूर्ण माहिती मिळत नाही, तोपर्यंत कोणताही अंदाज व्यक्त करता येणार नाही. तर पोलिसांनी या स्फोटामध्ये कोण टार्गेट होतं, याबद्दल सांगण्यास नकार दिला आहे. असं सांगितलं जात आहे की, आधी गॅसच्या पाइपलाइनचा स्फोट झाला असावा आणि त्यानंतर  IED चा स्फोट झाला.

पत्नी या गोष्टी आपल्या पतीला सहजपणे सांगू शकत नाही;याबाबत स्त्रियांना काय वाटतं?

हाफिज सईद ज्या ठिकाणी राहतो तिथे कडक बंदोबस्त असतो. त्यामुळे एवढी कडक सुरक्षा असताना हा भीषण स्फोट कसा झाला याबद्दल प्रश्न उपस्थितीत केले जात आहे. स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावर एक दुचाकी होती याच दुचाकीत स्फोट झाला, असा दावा करण्यात आला आहे.

Published by: sachin Salve

First published: June 23, 2021, 1:29 PM IST

Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *