Home » Uncategorized » देशावर युद्धाचं संकट, पंतप्रधान स्वतः बंदूक घेऊन रणांगणात

देशावर युद्धाचं संकट, पंतप्रधान स्वतः बंदूक घेऊन रणांगणात

देशावर-युद्धाचं-संकट,-पंतप्रधान-स्वतः-बंदूक-घेऊन-रणांगणात

देशावरील युद्धाचं (PM Abi Ahmad reaches battlefield with his gun) संकट गडद झाल्यामुळे सैनिकांचं नेतृत्व करण्यासाठी पंतप्रधान हातात बंदूक घेऊन स्वतः रणांगणात उतरले आहेत.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  नैरोबी, 25 नोव्हेंबर: देशावरील युद्धाचं (PM Abi Ahmad reaches battlefield with his gun) संकट गडद झाल्यामुळे सैनिकांचं नेतृत्व करण्यासाठी पंतप्रधान हातात बंदूक घेऊन स्वतः रणांगणात उतरले आहेत. इथियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांनी स्वतः मैदानात (PM Abi Ahmad in war) उतरत युद्धाचं नेतृत्व करण्याचा निर्णय घेतला असून युद्ध जिंकूनच माघारी परतण्याचा निर्धार केला आहे. युद्धजन्य इथियोपिया अफ्रिकेतील एक महत्त्वाचा देश असणाऱ्या इथियोपियावर टिग्रे भागातून अतिक्रमण होत आहे. टिग्रे भागाकडून लढणारे सैनिक इथियोपियावर वरचढ ठरू लागल्याचं चित्र गेल्या काही दिवासांपासून समोर येऊ लागलं आहे. आतापर्यंत इथियोपियाचे हजारो सैनिक धारातिर्थी पडले आहेत. यामुळे लढणाऱ्या सैनिकांचं मनोबलदेखील कमी होत असल्याचं चित्र दिसू लागलं आहे. यावर अंतिम तोडगा म्हणून स्वतः पंतप्रधानांनी युद्धाच्या मैदानात उतरण्याचा निर्णय़ घेतला आहे. नेत्यांनी युद्धावर जाण्याची परंपरा इथियोपिया हा सतत युद्धग्रस्त असणारा देश असून प्रमुख नेत्यांनी युद्धाच्या मैदानात उतरण्याची इथली जुनी परंपरा आहे. सम्राट हैली सैरासी आणि सम्राट योहनेस चतुर्थ यांच्यासह अनेक नेते युद्धात उतरल्याचा इतिहास आहे. 1889 च्या युद्धात योहनेस चतुर्थ हे शहीद झाले होते. पंतप्रधानांना नोबेल इथियोपियाचे युद्धात उतरलेले पंतप्रधान अबी अहमद यांना दोनच वर्षांपूर्वी नोबेल पुरस्कार मिळाला होता. मात्र आता ते स्वतःच युद्धात उतरले असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. देशाच्या सीमांचं रक्षण करणं आणि देशाचं सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी हे पाऊल गरजेचं असल्याचं त्यांचे समर्थक सांगत आहेत. सरकारकडून गोपनियता पंतप्रधान स्वतः युद्धात उतरल्याची अधिकृत घोषणा मात्र इथियोपिया सरकारनं केलेली नाही. पंतप्रधान सध्या कुठे आहेत आणि कुठन मोर्चा सांभाळत आहेत, याची माहितीदेखील गुप्त ठेवण्यात आली आहे. देशाच्या भवितव्यासाठी पंतप्रधानांची सुरक्षा हा मोठा चिंतेचा विषय आहे. पंतप्रधानांच्या जिवाला धोका निर्माण झाला, तर सैनिकांच्या मनोबलावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असून देशाचं भवितव्यदेखील अंधारात जाण्याची शक्यता आहे. हे वाचा- या पठ्ठ्यानं टॉयलेट पेपरवर लिहिला राजीनामा, बॉसही ठरला शेरास सव्वाशेर उप पंतप्रधान सांभाळतायत राज्यकारभार पंतप्रधान युद्धभूमीवर असल्यामुळे सध्या उप पंतप्रधान देशाचा कारभार सांभाळत असल्याचं चित्र आहे. उपपंतप्रधान देमेके मेक्कोनेन यांनी पंतप्रधानपदाचा हंगामी कार्यभार स्विकारला असून ते परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.

  Published by:desk news

  First published:

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *