Home » Uncategorized » चुकूनही इतरांच्या फोनला हात लावला तर तुरुंगवास; वाचा पाकिस्तानातील अजब कायदे

चुकूनही इतरांच्या फोनला हात लावला तर तुरुंगवास; वाचा पाकिस्तानातील अजब कायदे

चुकूनही-इतरांच्या-फोनला-हात-लावला-तर-तुरुंगवास;-वाचा-पाकिस्तानातील-अजब-कायदे

पाकिस्तानात एखाद्याच्या फोनला हात लावला तरी कायदा आहे. येथे परवानगीशिवाय कोणाच्याही फोनला हात लावणे बेकायदेशीर आहे.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  कराची 25 नोव्हेंबर : जगातील प्रत्येक देशाचे आपले वेगळे कायदे आणि नियम आहेत. काही देशांचे कायदे अतिशय लवचिक आहेत, तर काही देशांचे अतिशय कडक. काही देश असेही आहेत ज्यांचे कायदे अतिशय अजब आहेत (Weird Laws). हे कायदे हैराण करणारे असतात. असाच एक कायदा आपला शेजारी देश असलेल्या पाकिस्तानातही आहे (Strange laws in Pakistan). काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानमध्ये एक विधेयक मांडण्यात आलं होतं, ज्यामुळे जगभरातून पाकिस्तानवर टीका झाली होती. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात एक ठराव मांडण्यात आला होता. या विधेयकात पाकिस्तानातील तरुण-तरुणींचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर विवाह बंधनकारक करण्यात यावे, असं म्हटलं होतं. एवढंच नाही तर ते मान्य न केल्यास तुरुंगवासाची तरतूद असावी, असाही प्रस्ताव या विधेयकात होता. यामुळे समाजकंटकांना आळा बसेल आणि बलात्कार थांबण्यास मदत होईल, असे पाकिस्तानच्या नेत्यांचे म्हणणे आहे. हा कायदा जगासमोर आल्यानंतर पाकिस्तानसमोर पेच निर्माण झाला. मात्र पाकिस्तानमध्ये आधीच असे अनेक विचित्र कायदे आहेत, जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पाकिस्तानात एखाद्याच्या फोनला हात लावला तरी कायदा आहे. येथे परवानगीशिवाय कोणाच्याही फोनला हात लावणे बेकायदेशीर आहे. जर कोणी चुकून दुसऱ्याच्या फोनला परवानगीशिवाय हात लावला तर त्याच्यावर शिक्षेची तरतूद आहे. हा गुन्हा करणाऱ्याला ६ महिने तुरुंगवास होऊ शकतो. आपल्या शेजारी देशात शिक्षणासाठीही विद्यार्थ्यांना कर भरावा लागतो. जर एखाद्या विद्यार्थ्याने त्याच्या शिक्षणावर 2 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च केला तर त्याला त्याच्या शिक्षणाच्या शुल्कावर 5% कर भरावा लागतो. पाकिस्तानमध्ये कदाचित याच भीतीमुळेच लोक अभ्यासाकडे फार लक्ष देत नाहीत. पाकिस्तानमध्ये काही शब्दांचे इंग्रजीत भाषांतर करणे बेकायदेशीर मानले जाते. येथे तुम्ही अल्लाह, मस्जिद, रसूल किंवा नबी इत्यादी शब्दांचे इंग्रजी भाषांतर करू शकत नाही. जर एखाद्या व्यक्तीने या शब्दांचे इंग्रजी भाषांतर केले तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाते. पाकिस्तानचा नागरिक कधीही इस्रायलमध्ये जाऊ शकत नाही. पाकिस्तान सरकार आपल्या नागरिकांना इस्रायलला जाण्यासाठी व्हिसाच देत नाही.

  Published by:Kiran Pharate

  First published:

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *