Home » Uncategorized » विष पाजून130 वेळा वार करत बापाने केली मुलाची हत्या, कारण वाचून बसेल धक्का

विष पाजून130 वेळा वार करत बापाने केली मुलाची हत्या, कारण वाचून बसेल धक्का

विष-पाजून130-वेळा-वार-करत-बापाने-केली-मुलाची-हत्या,-कारण-वाचून-बसेल-धक्का

पत्नी तुरुंगात गेल्यानंतर Thomas आपल्या मुलाला घेऊन Emma Tustin हिच्या घरी शिफ्ट झाला. काही काळापर्यंत सर्व ठीक सुरू होतं, मात्र नंतर Emma ला आपल्या लव्ह लाईफमध्ये Arthur चा अडथळा जाणवू लागला.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  लंडन 25 नोव्हेंबर : अनेकदा असं म्हटलं जातं की आई-वडिलांना त्यांच्या पोटच्या मुलांपेक्षा महत्त्वाचं काहीच नसतं. विशेषतः मुलं लहान असताना तर आई-वडील त्यांची विशेष काळजी घेतात. मात्र एका कपलने ही बाब चुकीची सिद्ध केली आहे. प्रेमात अडथळा येत असल्याने एका बापाने आणि सावत्र आईने आपल्या सहा वर्षाच्या मुलाला विष पाजलं. यानंतर 130 वेळा त्याच्यावर वार करून त्याची हत्या केली (Mother and Father Brutally Killed Minor Son). द सनच्या वृत्तानुसार, ही घटना ब्रिटनच्या West Midland शहरातील आहे. Thomas Hughes (वय 29) आपली पत्नी Olivia (वय 26) आणि मुलगा Arthur (वय 6) सोबत सुखी आयुष्य जगत होते. मात्र त्यांच्या पत्नीचं दुसऱ्याच व्यक्तीवर प्रेम जडलं. प्रियकराने ब्रेकअप करण्याचा प्रयत्न करताच तिने त्याच्यावर चाकूने वार करत त्याची हत्या केली. यामुळे तिला 18 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. जेव्हा Thomas Hughes च्या पत्नीचं दुसऱ्या व्यक्तीसोबत अफेअर (Extramarital Affair of Woman) सुरू होतं, तेव्हा तो स्वतःही Emma Tustin (वय 32) नावाच्या महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये होता. पत्नी तुरुंगात गेल्यानंतर Thomas आपल्या मुलाला घेऊन Emma Tustin हिच्या घरी शिफ्ट झाला. काही काळापर्यंत सर्व ठीक सुरू होतं, मात्र नंतर Emma ला आपल्या लव्ह लाईफमध्ये Arthur चा अडथळा जाणवू लागला. आर्थर घरात खेळत असे आणि मस्ती करत असे, हे ईम्माला अजिबातही आवडत नव्हतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, Emma ने Thomas Hughes ला त्याच्याविरोधात भडकावून देत आर्थरला मारहाण करण्यास सुरुवात केली. अनेक तास ती त्याला घरात बंद करून ठेवत. त्याला ना जेवण दिलं जात, ना अंघोळ. एक दिवस आर्थरनं फोन करून हे सर्व आपल्या आजीला सांगितलं. यानंतर आजीने पोलिसांनी याबाबत माहिती दिली. मात्र पुढे काहीच झालं नाही. मागील वर्षी १६ जूनला पोलिसांना आर्थर जखमी झाल्याचा ऱोन आला. पोलीस घरी पोहोचले तेव्हा पाहिलं की तो पाठीवर कोसळला होता आणि त्याचा श्वास बंद होता. त्याचं शरीर पिवळं पडलं होतं. शवविच्छेदनात समोर आलं की त्याच्या जेवणात विष किंवा काहीतरी पदार्थ मिसळण्यात आला आहे. यामुळे तो बेशुद्ध झाला. यानंतर काठीने किंवा जड हत्याराने त्याच्यावर 130 वेळा वार केले गेले. डोक्यापासून पायापर्यंत शरीरातील कोणताही भाग असा नव्हता ज्याची हाडं तुटली नव्हती. अतिशय निघृणपणे त्याची हत्या करण्यात आली होती. जेव्हा पोलिसांनी Thomas Hughes कडे चौकशी केली तेव्हा त्याने सांगितलं की मुलाच्या मागणीनुसार त्याला कोका कोला पिण्यासाठी दिला होता. यानंतर खेळता-खेळता तो पायरीवरुन खाली कोसळला. यामुळे त्याला इतकी दुखापत झाली आहे. मात्र शवविच्छेदनात त्याचं खोटं समोर आलं. पोलिसांनी आर्थरच्या काही सीसीटीव्ही क्लिप कोर्टात सादर केल्या. यातील एका क्लिपमध्ये तो बोलत आहे की बाबा मला खिडकीतून खाली फेकणार आहेत. तर दुसऱ्या क्लिपमध्ये तो म्हणत आहे की घरात कोणीच माझ्यावर प्रेम करत नाही. सध्या या प्रकरणात Thomas Hughes आणि Emma Tustin यांना आरोपी बनवलं गेलं आहे. सध्या चौकशी सुरू असून ते दोषी सिद्ध झाल्यास त्यांना २० वर्ष तुरुंगवासाची शिक्षा मिळू शकते.

  Published by:Kiran Pharate

  First published:

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *