Home » Uncategorized » Alien बनण्याच्या हौसेपोटी स्वतःचीच केली भयंकर अवस्था; शरीराचे अनेक पार्ट कापले

Alien बनण्याच्या हौसेपोटी स्वतःचीच केली भयंकर अवस्था; शरीराचे अनेक पार्ट कापले

alien-बनण्याच्या-हौसेपोटी-स्वतःचीच-केली-भयंकर-अवस्था;-शरीराचे-अनेक-पार्ट-कापले

33 वर्षीय अँथनीने आपल्या डाव्या हाताची दोन बोटं कापली. याआधीच त्याने आपलं नाक, कान आणि ओठ कापून टाकले आहेत

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  नवी दिल्ली 25 नोव्हेंबर : जगात अतिशय वेगवेगळ्या पद्धतीचे आणि अजब विचारांचे लोक पाहायला मिळतात. काही सुंदर दिसण्यासाठी भरपूर प्रयत्न करत आहेत तर कोणी स्वतःला कुरूप बनवण्यासाठी पैसे खर्च करत आहे. फ्रान्समध्ये राहणाऱ्या अँथनी लोफ्रेडो (Anthony Loffredo) याने एलियनप्रमाणे (Alien) दिसण्यासाठी स्वतःच्या चेहऱ्यावरील काही गरजेचे पार्टच कापले (Man Chopped off Many Parts of Body). हद्द तर तेव्हा झाली जेव्हा त्याने आपल्या हाताची बोटंही कापली. 33 वर्षीय अँथनीने आपल्या डाव्या हाताची दोन बोटं कापली. त्याने मॅक्सिको इथे जात एक सर्जरी करवून घेतली. याआधीच त्याने आपलं नाक, कान आणि ओठ कापून टाकले आहेत. अँथनीने आपली एलियन बनण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आधीपासूनच काळ्या रंगाचा टॅटू (Black Tattoo on Body) संपूर्ण शरीरावर गोंदवला आहे. लोफ्रेडनं संपूर्ण शरीरावर टॅटू काढले आहेत. त्याने आपल्या डोळ्यांमध्येही काळ्या रंगाचा टॅटू बनवून घेतला आहे. लोफ्रेडोचं असं म्हणणं आहे की त्याला पूर्णपणे ब्लॅक एलियन बनण्यासाठी 35 टक्के मॉडिफिकेशनची गरज आहे. Daily Mail च्या वृत्तानुसार, तो आणखीही सर्जिकल प्रोसिजर्सद्वारे स्वतःला ब्लॅक एलियनमध्ये बदलणार आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे 7 लाख 30 हजार फॉलोअर्स आहेत. या फॉलोअर्सला त्याने आपल्या पोस्टच्या माध्यमातून सर्जरीची माहिती दिली आहे. त्याचं असं म्हणणं आहे की त्याने आपल्या डाव्या हाताची बोटं कापली आहेत आणि लवकरच तो उजव्या हाताची बोटंही कापणार आहे. लोफ्रेडोची ही जिद्द पाहून लोक हैराण झाले आहेत. एका यूजरनं लिहिलं, अरे देवा, मला तर या गोष्टीवर विश्वासच बसत नाहीये की तू असं काही केलं आहे. अनेकांनी यावर निगेटिव्ह कमेंट करत म्हटलं की ज्यांच्या हातात आणि पायात आधीपासूनच अशा पद्धतीच्या अडचणी असतात, त्यांचा हा अपमान आहे. अनेकांनी असंही म्हटलं की पुढे त्याला आपल्या या निर्णयाचा पश्चाताप होईल. याआधी त्याने कान, नाक आणि ओठ कापून स्वतःचा चेहरा बिघडवला होता. त्याने स्पेनमध्ये जाऊन हे करवून घेतलं होतं. अनेक यूरिपियन देशांमध्ये अशा प्रकारची सर्जरी अवैध मानली जाते.

  Published by:Kiran Pharate

  First published:

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *