Home » आंतरराष्ट्रीय » इस्त्रायल मास्कमुक्तीकडून पुन्हा मास्कसक्तीकडे, पसरतेय डेल्टा व्हायरसची दहशत

इस्त्रायल मास्कमुक्तीकडून पुन्हा मास्कसक्तीकडे, पसरतेय डेल्टा व्हायरसची दहशत

इस्त्रायल-मास्कमुक्तीकडून-पुन्हा-मास्कसक्तीकडे,-पसरतेय-डेल्टा-व्हायरसची-दहशत

Delta varient चे काही रुग्ण इस्त्रायलमध्येही आढळले आहेत. त्यामुळे इस्त्रायल सरकारने आता सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचे आदेश काढले आहेत.

  • Maharashtra Maza News
  • Last Updated: Jun 25, 2021 03:28 PM IST

जेरूसलेम, 25 जून : कोरोनावर (Corona) सर्वात जलद मात करणारा आणि सर्वप्रथम मास्कपासून मुक्ती (Mask Free) मिळवणारा देश असं बिरूद मिरवणाऱ्या इस्त्रायलमध्ये (Israel) पुन्हा एकदा नागरिकांना चेहऱ्यावर मास्क चढवण्याची वेळ आली आहे. याचं कारण आहे सध्या जगभर दहशत पसरवत असलेला कोरोनाचा डेल्टा व्हेरियंट. (Delta Varient) जगातील अनेक देशांमध्ये पसरत असलेल्या डेल्टा व्हायरसचे काही रुग्ण इस्त्रायलमध्येही आढळले आहेत. त्यामुळे इस्त्रायल सरकारने आता सार्वजनिक ठिकाणी (Public Places) मास्क वापरण्याचे आदेश काढले आहेत.

इस्त्रायल सरकारकडून भारताचा उल्लेख

कोरोनाचा डेल्टा व्हायरस हा सर्वप्रथम भारतात आढळला आणि त्यानंतर तो जगभर पसरला. या व्हायरसचा आता इस्त्रायली नागरिकांना त्रास होत असल्याची प्रतिक्रिया इस्त्रायल सरकारनं दिली आहे. इस्त्रायलमध्ये बहुतांश नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. मात्र लस घेतलेल्या नागरिकांनाही डेल्टा व्हायरसची लागण होत असल्याचं दिसून आल्यामुळे सरकारच्या चिंतेत भर पडली आहे. इस्त्रायलमध्ये आतापर्यंत 8 लाख 40 हजार 225 नागरिकांना कोरोना झाला असून त्यापैकी 6,428 जणांचा मृत्यू झाला आहे.

रेडिओवरून नागरिकांना आवाहन

इस्त्रायलमध्ये एकाच दिवस 100 पेक्षा अधिक कोरोना नागरिक आढळून आले आहेत. ही चिंतेची बाब असून त्यामुळे सर्व सार्वजनिक ठिकाणांवर मास्क वापरणे आता बंधनकारक करण्यात येत असल्याची घोषणा कोरोना टास्कफोर्सचे प्रमुख नचमन ऐश यांनी इस्त्रायलच्या सरकारी रेडिओ केंद्रावरून केली आहे. भारतात आढळून आलेल्या डेल्टा व्हायरसचा परिणाम जगातील इतर देशांवर होईल, असा अंदाज होताच आणि तो खरा ठरल्याचं ऐश यांनी म्हटलं आहे.

18 वर्षांखालील नागरिकांच्या लसीकरणाची मागणी

इस्त्रायलमधील कोरोना नियंत्रणात आल्यानंतर गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याची सक्तीदेखील हटवण्यात आली होती. मात्र 18 वर्षांखालील नागरिकांचं लसीकरण झालेलं नसल्यामुळे त्यांना डेल्टा व्हेरिअंटचा अधिक धोका असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या वयोगटाचं लसीकरणाही लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी इस्त्रायलमध्ये जोर धरते आहे.

हे वाचा – तिसऱ्या लाटेत राज्यातील 50 लाख लोकांना होणार कोरोना? इशाऱ्यानंतर सरकार कामाला

विमानतळावर होणार कडक तपासणी

आंतरराष्ट्रीय प्रवास करून येणाऱ्या नागरिकांमुळे डेल्टा व्हायरस इस्त्रायलमध्ये आल्याचं पंतप्रधान नफ्तालींनी म्हटलंय. इस्त्रायल विमानतळावर यापुढे कोरोना चाचणी आणि विलगीकरण यांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले असून काही देशांतील नागरिकांच्या आगमनावर बंदी घातली जाण्याची शक्यतादेखील व्यक्त केली आहे.

Published by: desk news

First published: June 25, 2021, 3:28 PM IST

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *