Home » आंतरराष्ट्रीय » अन्ननलिका जाळून काढली; रिमोटची बॅटरी गिळताच तासाभराने गेला चिमुकलीचा जीव

अन्ननलिका जाळून काढली; रिमोटची बॅटरी गिळताच तासाभराने गेला चिमुकलीचा जीव

अन्ननलिका-जाळून-काढली;-रिमोटची-बॅटरी-गिळताच-तासाभराने-गेला-चिमुकलीचा-जीव

खेळता खेळता चिमुकलीने रिमोटची बॅटरी गिळली आणि…

  • Maharashtra Maza News
  • Last Updated: Jun 29, 2021 09:46 PM IST

ब्रिटन, 29 जून : लहान मुलं खेळता खेळता कधी काय करतील याचा नेम नाही. नाणी असू दे, एखादी छोटी वस्तू असू दे किंवा खेळण्याचा छोटासा भाग. लहान मुलं आपल्या हाताला लागणारी प्रत्येक वस्तू नाकात किंवा तोंडात टाकतात. अशाच एका चिमुकलीने रिमोट कंट्रोलमधली बॅटरी गिळली आणि अवघ्या तासाभरातच (Girl swallowed battery) तिचा मृत्यू झाला.

इंग्लंडच्या स्टोक ऑन ट्रेंट सिटीत राहणारी दोन वर्षांची हार्पर. टॉफी समजून तिनं रिमोट कंट्रोलची बॅटरी गिळली. त्यानंतर तिची प्रकृती बिघडली. तिला तात्काळ रुग्णालयात आणण्यात आणलं पण तिचा मृत्यू झाला.

हार्परची आई स्टेसी निकलिनने सांगितलं, जेव्हा ती आपल्या दोन वर्षांच्या हार्परची अवस्था आठवते तेव्हा तिच्या अंगावर काटे येतात.

हार्पर तिच्या खोलीत एकटीच होती, जेव्हा तिच्यासोबत ही घटना घडली. तिनं काहीतरी गिळली. त्यानंतर तिचं डोकं अचानक मागच्या दिशेनं जाऊ लागलं आणि तिच्या तोंडातून रक्त येऊ लागलं. ती काहीच बोलू शकत नव्हती, तिचे डोळे बंद झाले. त्यानंतर तिला तात्काळ रॉयल स्टोक युनिव्हर्सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या बॅटरीमुळे हार्परची अन्ननलिका पेटली होती, त्याला होल पडले होते. तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मिररच्या रिपोर्टनुसार सर्जरी करतानाच हार्परचा मृत्यू झाला.

डॉक्टरांनी सांगितलं की, कदाचित तिच्या मुलीने बॅटरी गिळली असावी. तिच्या आईने घरी जाऊन पाहिलं तर रिमोट कंट्रोलमधील बॅटरी गायब होती.  एका खेळण्यामुळेही मुलीचा जीव जाऊ शकतो, असं कधी वाटलं नव्हतं, असं स्टेसी म्हणाली. आपल्या लेकीचा जसा मृत्यू झाला, आपल्या वाटी जे दुःख आलं ते इतरांच्या वाट्याला येऊ नये म्हणून हार्परचे आई-वडील इतर पालकांना जागरूक करत आहे. मुलांना रिमोट आणि बॅटरी असलेल्या खेळण्यांपासून दूर ठेवा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

Published by: Priya Lad

First published: June 29, 2021, 9:46 PM IST

Leave a Reply

Your email address will not be published.