Home » आंतरराष्ट्रीय » मुलाच्या हातामध्ये फोन देणं पडलं महागात, वडिलांना कार विकून फेडावं लागलं कर्ज

मुलाच्या हातामध्ये फोन देणं पडलं महागात, वडिलांना कार विकून फेडावं लागलं कर्ज

मुलाच्या-हातामध्ये-फोन-देणं-पडलं-महागात,-वडिलांना-कार-विकून-फेडावं-लागलं-कर्ज

सात वर्षाच्या मुलाच्या हातामध्ये खेळण्यासाठी आयफोन (iPhone) देणे त्याच्या वडिलांना चांगलेच महाग पडले. या मुलाने आयफोनवर गेम खेळता-खेळता इतकं बिल केलं की ते चुकवण्यासाठी त्यांच्यावर कार विकण्याची वेळ आली.

  • Maharashtra Maza News
  • Last Updated: Jun 30, 2021 03:50 PM IST

मुंबई, 30 जून: अनेक लहान मुलांमध्ये मोबाईल (Mobile) आणि अन्य गॅझेटची आवड ही सामान्य गोष्ट आहे. मुलाची ही आवड पूर्ण करण्यासाठी आई-वडिल त्यांना अगदी लहान वयात मोबाईल फोन वापरायला देतात. मुलाच्या हातामध्ये मोबाईल दिल्यावर तो त्याचा वापर कशासाठी करतोय हे पाहण्याची जबाबदारी देखील पालकांची आहे. अन्यथा त्यांच्यावर मोठं संकट ओढावू शकते.

ब्रिटनमधील सात वर्षाच्या मुलाच्या हातामध्ये खेळण्यासाठी आयफोन (iPhone) देणे त्याच्या वडिलांना चांगलेच महाग पडले. या मुलाने आयफोनवर गेम खेळता-खेळता इतकं बिल केलं की ते चुकवण्यासाठी त्यांच्यावर कार विकण्याची वेळ आली. ‘डेली मेल’ ने हे वृत्त दिलं आहे.

या वृत्तानुसार वडिलांच्या आयफोनवर हा मुलगा Dragons : The Rise of Berk हा गेम खेळत होता. तो सुरुवातीला या गेमचं फ्री व्हर्जन खेळत होता. पण या प्रकारातून पेड प्रकारात कसा गेला हे घरी कुणाला समजलेच नाही. त्याने एकापाठोपाठ एक अ‍ॅप विकत घेण्यास  सुरुवात केली. या सर्वांचे बिल 1,800 डॉलर (जवळपास 1 लाख 3o हजार) इतके झाले.

Dragons : The Rise of Berk  या खेळात गेम इन परजेसचा पर्याय आहे. यामध्ये 2.60 डॉलर ते 138 डॉलरपर्यंतच्या खरेदीचे पर्याय आहेत. या मुलाने खेळता-खेळता थेट 1.30 लाख रुपये बिल केल्यानंतर पालकांना त्याची माहिती झाली. तब्बल 29 ईमेलच्या माध्यमातून त्यांना हे बिल आले. हे बिल चुकवण्यासाठी वडिलांना घरातील कार विकावी लागली.

Google मेसेजमध्ये मिळणार नवं फीचर; OTP मेसेज आपोआप होणार डिलीट

या प्रकरणाची वडिलांनी अ‍ॅपल स्टोरकडे तक्रार केली आहे. त्या तक्रारीनंतर त्यांना 287 डॉलर परत मिळाले. मात्र या मुलाने खरेदी करण्यासाठी आयफोनमधील authentication चा टप्पा कसा पार केला याची माहिती अजून समजलेली नाही. आयफोनमधील हा टप्पा पार करण्यासाठी पासवर्ड किंवा बायो-मेट्रीकचा वापर केला जातो.

Published by: Maharashtra Maza News

First published: June 30, 2021, 3:45 PM IST

Leave a Reply

Your email address will not be published.