Home » आंतरराष्ट्रीय » भारताच्या दणक्याने उघडले युरोपचे डोळे, 7 देशांची Covishield ला मान्यता

भारताच्या दणक्याने उघडले युरोपचे डोळे, 7 देशांची Covishield ला मान्यता

भारताच्या-दणक्याने-उघडले-युरोपचे-डोळे,-7-देशांची-covishield-ला-मान्यता

भारताच्या दणक्यानंतर युरोपमधील स्वित्झर्लंडसह 7 देशांनी कोव्हिशिल्ड लशीचा मान्यता दिल्यामुळे भारतीयांना आता युरोपचे दरवाजे उघडणार आहेत.

  • Maharashtra Maza News
  • Last Updated: Jul 1, 2021 03:22 PM IST

नवी दिल्ली, 1 जुलै: युरोपमधील स्वित्झर्लंडसह 7 देशांनी (7 Countries) भारतात उत्पादित होणाऱ्या कोव्हिशिल्ड (Covishield) लशीचा मान्यता (Approval) दिल्यामुळे भारतीयांना आता युरोपचे दरवाजे उघडले आहेत. भारताच्या दणक्यानंतर अवघ्या 24 तासांत 7 देशांनी कोव्हिशिल्डला मान्यता दिली आहे. युरोपमध्ये फिऱण्यासाठी युरोपियन युनीयननं (EU) ग्रीन पास (Green Pass) नावाची कल्पना अंमलात आणली आहे. ज्यांनी मान्यताप्राप्त लशींचे डोस घेतले आहेत, त्यांनाच युरोपातील एका देशातून दुसऱ्या देशात फिरण्याची मुभा आहे. आता 7 देशांनी कोव्हिशिल्ड लशीलाही मान्यता दिल्यामुळे भारतीयांचा युरोपात फिरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

भारताच्या दणक्यानं 7 देश नरमले

भारतानं लशींना मान्यता देण्याची रितसर मागणी केल्यानंतर एकाच दिवसात युरोपातील 7 देशांनी कोव्हिशिल्ड लशीला मान्यता दिली आहे. यात स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, जर्मनी, स्लोव्हेनिया, ग्रीस, आईसलंड, आयर्लंड आणि स्पेन या देशांचा समावेश आहे. गुरुवारी या सात देशांनी कोव्हिशिल्ड लशीचा ग्रीन पाससाठीच्या यादीत समावेश करून घेतला.

मान्यता मिळणारी पाचवी लस

युरोपात आतापर्यंत केवळ चारच लसींना मान्यता मिळाली आहे. यामध्ये फायझर, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन आणि वॅक्सझेरविया यांचा समावेश आहे. अर्थात कोव्हिशिल्ड आणि वॅक्सझेरविया या दोन्ही लशी ऍस्ट्राझेनका आणि ऑक्सफर्ड याच कंपनीनं तयार केल्या आहेत. मात्र वेगवेगळ्या देशात त्याची वेगवेगळी नावं ठेवण्यात आली आहेत. लसींच्या निर्मितीचं सूत्र आणि त्यातील फॉर्म्युला एकच असताना केवळ वेगळ्या नावामुळे कोव्हिशिल्डचा समावेश आतापर्यंत करण्यात आला नव्हता. मात्र भारतानं विनंती केल्यानंतर 24 तासांतच ही औपचारिकता 7 युरोपिय देशांनी पूर्ण केलीय.

हे वाचा -शरीरावर प्रयोग करू नका! कोरोना ऐवजी काढा पिण्यानेच जावं लागेल रुग्णालयात

भारताकडून Covaxin च्या मान्यतेचीही शिफारस

कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लशींना युरोपीयन युनियननं मंजुरी द्यावी, अशी मागणी भारत सरकारच्या वतीनं बुधवारी करण्यात आली. कोव्हिशिल्डला याअगोदरच जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळालेली आहे, तर कोव्हॅक्सिनला मान्यता मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे युरोपीयन युनीयननंदेखील दोन्ही लशींना मान्यता देऊन भारतीयांचा युरोपात फिऱण्याचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी भारत सरकारकडून करण्यात आली होती. सध्या तरी केवळ सातच देशांनी याला प्रतिसाद देत केवळ कोव्हिशिल्डला मान्यता दिली आहे.

युरोपातील देशांना अधिकार

युरोपियन युनियननं जरी मान्यता दिली नसली, तरी प्रत्येक देश आपल्या पातलीवर लशीला मान्यता देऊ शकतो, असं युरोपियन युनीयनं स्पष्ट केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं मान्यता दिलेल्या लशींना हे देश मान्यता देऊ शकतात. त्यामुळे कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटना जेव्हा मान्यता देईल, तेव्हा युरोपीय देशांमधील मान्यतेचा मार्गही मोकळा होईल, असं सांगितलं जात आहे.

Published by: desk news

First published: July 1, 2021, 2:21 PM IST

Leave a Reply

Your email address will not be published.