Home » Uncategorized » मुलाचं पॉर्न कलेक्शन फेकून देणाऱ्या पालकांना न्यायालयाचा दणका, 22 लाखाचा दंड

मुलाचं पॉर्न कलेक्शन फेकून देणाऱ्या पालकांना न्यायालयाचा दणका, 22 लाखाचा दंड

मुलाचं-पॉर्न-कलेक्शन-फेकून-देणाऱ्या-पालकांना-न्यायालयाचा-दणका,-22-लाखाचा-दंड

या कपलनं आपल्या सेक्स अॅडिक्ट (Sex Addict) मुलाचं पॉर्न कलेक्शन (Porn Collection) फेकून दिलं होतं. मात्र, मुलानं याविरोधात कोर्टात तक्रार केली. यानंतर कोर्टानं आई वडिलांना 22 लाख रुपयांचा दंड सुनावला आहे.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  नवी दिल्ली 29 ऑगस्ट : आई-वडील आपल्या मुलांसाठी नेहमी चांगलाच विचार करतात. मात्र, जर कोर्टानं आई वडिलांचा निर्णय चुकीचा ठरवत निर्णय (Court Weird Judgement) दिला तर? अमेरिकेच्या कोर्टात दिलेल्या अशाच एका निर्णयामुळे खळबळ उडाली आहे. येथे पश्चिम मिशिगनमध्ये राहणाऱ्या एका कपलला कोर्टानं आपल्या मुलाला 22 लाख रुपये भरपाई म्हणून देण्याचा निर्णय सुनावला आहे. या कपलनं आपल्या सेक्स अॅडिक्ट (Sex Addict) मुलाचं पॉर्न कलेक्शन (Porn Collection) फेकून दिलं होतं. मात्र, मुलानं याविरोधात कोर्टात तक्रार केली. यानंतर कोर्टानं आई वडिलांना 22 लाख रुपयांचा दंड सुनावला आहे. जज पॉल मॅलोनी यांच्या कोर्टात ही अजब सुनावणी झाली. यात 43 वर्षीय डेविड वर्किंगनं आपल्या आई वडिलांविरोधात कोर्टात धाव घेतली. डेविडनं असा आरोप केला, की त्याच्या पालकांनी त्यानं आयुष्यभर जमा केलेलं प़ॉर्न कलेक्शन फेकून दिलं. यामुळे त्याला प्रचंड त्रास झाला. या प्रकरणी निर्णय देत कोर्टानं त्याच्या आई वडिलांना 22 लाखाचा दंड ठोठावला. आठ महिने चाललेल्या सुनावणीनंतर कोर्टानं हा निर्णय सुनावला. लैंगिक शोषणाच्या भावनेविना मुलीच्या गालाला हात लावणे हा गुन्हा नाही – हायकोर्ट डेविडनं सांगितलं, की त्याच्या आई वडिलांनी त्याचं पॉर्न कलेक्शन फेकून दिलं. यात पॉर्न फिल्म, मॅगझिन आणि काही सेक्स टॉय होते. डेविडनं म्हटलं, की त्याचं पॉर्न कलेक्शन फेकून देण्याचा पालकांना काहीही अधिकार नव्हता. ही केस दाखल झाल्यानंतर जजनं एका टीमचं गठन केलं. या टीमनं फेकण्यात आलेल्या सामानाची किंमत काढली. या सर्व सामानाची किंमत जवळपास 22 लाख होती. ही भरपाई मुलाला देण्याचा निर्णय कोर्टानं सुनावला. या प्रकरणी बोलताना डेविडच्या आई वडिलांनी सांगितलं, की त्यांच्या मुलाला पॉर्नचं व्यसन लागलं होतं. ही सवय सोडवण्यासाठी त्यांनी हे सगळं केलं. कलेक्शनमध्ये काही अश्लील मॅगझिनही होते. मात्र, हे फेकण्याचा आई वडिलांना काहीही अधिकार नव्हता असं डेविडचं म्हणणं आहे.

  Published by:Kiran Pharate

  First published:

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *