Home » Uncategorized » अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी घेतली Qualcomm च्या सीईओंची भेट

अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी घेतली Qualcomm च्या सीईओंची भेट

अमेरिका-दौऱ्यात-पंतप्रधान-मोदींनी-घेतली-qualcomm-च्या-सीईओंची-भेट

अमेरिका दौऱ्यावर पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Qualcomm चे सीईओ क्रिस्टियानो अमोन (Cristiano Amon) यांची भेट घेत डिजिटल इंडियाला (PM Modi welcomes new investment in India) एक पाऊल पुढे घेऊन जाण्याचा संकल्प केला.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  वॉशिंग्टन डीसी, 23 सप्टेंबर : अमेरिका दौऱ्यावर पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Qualcomm चे सीईओ क्रिस्टियानो अमोन (Cristiano Amon) यांची भेट घेत डिजिटल इंडियाला (PM Modi welcomes new investment in India) एक पाऊल पुढे घेऊन जाण्याचा संकल्प केला. Qualcomm कंपनीची भारतात मोठी गुंतवणूक असून रिसर्च अँड डेव्हलपमेंटसह अनेक क्षेत्रात ही कंपनी कार्यरत आहे. या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘डिजिटल इंडिया’ची माहिती देत नव्या गुंतवणूक प्रस्तावांचं स्वागत केलं. काय म्हणाले अमोन भारत ही जगातील सर्वोत्तम बाजारपेठ असून भविष्यात भारताला मोठ्या संधी असल्याचं Qualcomm चे सीईओ क्रिस्टियानो अमोन यांनी म्हटलं आहे. भारतासोबत काम करण्यासाठी आपण नेहमीच उत्सुक असल्याचं त्यांनी पंतप्रधान मोदींना सांगितलं. भारत ही एक सर्वोत्तम बाजारपेठ आहेच, मात्र त्याचवेळी एक सक्षम निर्यातदार देश हीदेखील भारताची ओळख असल्याचं त्यांनी म्हटलं. भारताची अनेक क्षेत्रात निर्यात करण्याची क्षमता अफाट असून त्यामुळे भारताचं भवितव्य उज्ज्वल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भारतानं देशांतर्गत गरजा लक्षात घेऊन उत्पादन तर करावंच, मात्र त्याचसोबत इतर देशांच्या गरजा भागवण्याचंही काम करावं, असा सल्ला त्यांनी दिला. एकत्र काम करण्याचा प्रस्ताव भारतासोबत सेमी-कंडक्टरच्या क्षेत्रात एकत्र काम करायला आवडेल, असा प्रस्ताव त्यांनी दिला. त्याचप्रमाणे इतर क्षेत्रातील गुंतवणूक आणि आगामी 5G नेटवर्कच्या मुद्द्यावरही या भेटीत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. पंतप्रधानांनी दिलं आश्वासन Qualcomm ला भारतात ज्या ज्या गोष्टींची गरज असेल, त्या पुरवण्यासाठी पुढाकार घेण्याचं आश्वासन पंतप्रधान मोदींनी अमोन यांना दिलं. भारतात अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आकार घेत असून त्याबाबत एकत्रित काम करण्याचा मनोदय पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला. Qualcomm  नं नाविक प्रकल्पात जसा सहभाग घेतला, तसंच सहकार्य 5G आणि इतर बाबींसाठी द्यावं, असं ते म्हणाले. हे वाचा – पाकिस्तान आणि चीनचा डाव फसला, UN मध्ये तालिबानला प्रतिनिधित्व नाहीच भारतातील नव्या ड्रोन पॉलिसीबाबतही त्यांनी अमोन यांना माहिती दिली. बदललेल्या धोरणाचा Qualcomm ला चांगलाच फायदा करून घेणं शक्य असल्याचं त्यांनी सांगितलं. परस्पर सहकार्यानं नव्या व्यापारी संधी शोधण्यावर या बैठकीत एकमत झालं.

  Published by:desk news

  First published:

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *