Home » Uncategorized » महिलेनं घरी आणला श्वान; वर्षभरानंतर झाला मोठा खुलासा, डॉक्टरही हैराण

महिलेनं घरी आणला श्वान; वर्षभरानंतर झाला मोठा खुलासा, डॉक्टरही हैराण

महिलेनं-घरी-आणला-श्वान;-वर्षभरानंतर-झाला-मोठा-खुलासा,-डॉक्टरही-हैराण

69 वर्षीय महिला जेन डाउन्स हिला अजिबातही कल्पना नव्हती, की एका वर्षाआधी तिनं ज्या कुत्र्याला आपल्यासोबत घरी आणलं आहे तो पूर्णपणे आंधळा आहे

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  लंडन 23 सप्टेंबर : 69 वर्षीय महिला जेन डाउन्स हिला अजिबातही कल्पना नव्हती, की एका वर्षाआधी तिनं ज्या कुत्र्याला आपल्यासोबत घरी आणलं आहे तो पूर्णपणे आंधळा आहे. ही गोष्ट ब्रिटनमध्ये (Britain) राहणाऱ्या डेव (Blind Doggy Dave) या श्वानाची आणि त्याच्या मालकीणीची आहे. विशेष बाब म्हणजे हा कुत्रा आंधळा (Blind dog) असूनही पाहू शकतो. डॉक्टरांनी या केसला मेडिकल मिस्ट्री (Medical Mystery) असं नाव दिलं आहे. कॅम्ब्रिजमध्ये राहणाऱ्या जेननं सांगितलं, की डेवनं कधीच चुकीच्या ठिकाणी आपला पंजा ठेवला नाही. आंधळा असूनही तो अगदी अचूकपणे रस्त्यावर चालत असे. हे ऐकून पशुवैद्यकही हैराण झाले. महिला दिवसभर या श्वानासोबत खेळत असते आणि तोदेखील इतर कुत्र्यांसोबत खेळत राहतो. मात्र, त्यानं कधीही हे जाणवू दिलं नाही की तो आंधळा आहे. त्याच्या जन्मानंतरच त्याची रेटिना डेव्हलप झाली नव्हती. सध्या डेवचं वय पाच ते सात वर्ष आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, तो पूर्णपणे आंधळा आहे. मात्र, तरीही हा कुत्रा सगळं पाहू शकतोय हे जाणून पशुवैद्यकही हैराण झाले. नवरीला पाहताच मंडपातच ढसाढसा रडू लागला नवरदेव; VIDEO पाहून नेटकरीही भावुक जेननं म्हटलं, की हैराण करणारी बाब ही आहे, की हा कुत्रा आंधळा असूनही सगळं पाहू शकतो. हे कसं शक्य आहे असा प्रश्न महिलेला पडला आहे. महिला डेवला फेब्रुवारी 2020 मध्ये अॅनिमल रेस्क्यू सेंटरमधून घेऊन आली होती. पशुवैद्यकही त्याच्या या आजाराबाबत काहीही सांगू शकले नाहीत. अनेकांनी महिलेला म्हटलं होतं, की तिच्या कुत्र्याचे डोळे खूप सुंदर आहेत. मात्र, तिला कुत्रा आंधळा असल्याचं माहिती नव्हतं. तरुणीच्या हातावरील टॅटू पाहून घाबरला घरमालक; अजब कारण सांगत केली हकालपट्टी जेननं सांगितलं, की डिसेंबर महिन्यात एका पेट शॉपमध्ये चालत असताना डेव कशाला तरी धडकला. तेव्हा दुकानाच्या मालकानं सांगितलं, की कदाचित हा कुत्रा आंधळा आहे. हे ऐकताच महिलेनं आपल्या श्वानाला पशुवैद्यकांकडे नेलं. इथे डॉक्टरांनी सांगितलं की या श्वानाचे रेटिना डेव्हलप न झाल्यानं तो जन्मापासूनच पूर्णतः आंधळा आहे. या रहस्याचा खुलासा करण्यासाठी महिला या श्वानाला कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या डेविड विलियम्स यांच्याकडे घेऊन गेली.. ते टॉप वेटरनरी आहेत. त्यांनी डेवची तपासणी केल्यानंतर सांगितलं, की मी माझी आयुष्यात अनेक ब्लाईंड डॉगी पाहिले आहेत. मात्र, डेवसारखी एकही केस पाहिली नाही, ही एक मेडिकल मिस्ट्री आहे. हे मी तुम्हाला समजावूही शकत नाही. आपल्याला असं वाटतं, की आपल्याला सर्व माहिती आहे. मात्र, प्रत्येकच वेळी असं नसतं, असंही त्यांनी पुढे म्हटलं

  Published by:Kiran Pharate

  First published:

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *